उस्मानाबाद -शहरातील ओम काॅम्प्लेक्समधील पशुखाद्य विक्रीचे दुकान फाेडून अज्ञाताने सुमारे २३ पाेती सरकी पेंड लंपास केली. या प्रकरणी उस्मानाबाद शहर पाेलीस ठाण्यात २ मार्च राेजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद शहरातील तांबरी विभागात वास्तव्यास असलेले श्रीरंग प्रभू दराडे यांचे शहरातीलच ओम काॅम्प्लेक्समध्ये पशुकाद्य विक्रीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते आपले दुकान बंद करून गेले असता, अज्ञात चाेरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील पत्रा उचकटून आत प्रवेश मिळविला. यानंतर आतील प्रत्येकी ४८ किलाे ग्रॅम वजनाची सुमारे २३ पाेती सरकी पेंड अज्ञाताने लंपास केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर श्रीरंग प्रभू दरगडे (रा. तांबरी) यांनी उस्मानाबाद शहर पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञाताविरूद्ध भादंसंचे कलम ४६१, ३८० अन्वये गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.