‘सन्माना’ची रक्कम कर्जखाती वळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:44 IST2021-06-16T04:44:02+5:302021-06-16T04:44:02+5:30

बोरगाव धनेश्वरी हे गाव कळंब येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेला दत्तक आहे. या बँकेत गावातील बहुतांश शेतकऱ्यांची कर्ज व बचत ...

The amount of ‘honor’ goes to the loan account | ‘सन्माना’ची रक्कम कर्जखाती वळती

‘सन्माना’ची रक्कम कर्जखाती वळती

बोरगाव धनेश्वरी हे गाव कळंब येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेला दत्तक आहे. या बँकेत गावातील बहुतांश शेतकऱ्यांची कर्ज व बचत खाते काढलेले आहेत. याशिवाय प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व संजय गांधी निराधार योजना यांच्या अनुदानासाठीही अनेकांनी या बँकेचे खाते क्रमांक जोडलेले आहे.

यास्थितीत संगायो व पीएम किसानची मदत थेट खात्यावर जमा होते. यापैकीच लिंबराज किसन चोरघडे व अन्य एका शेतकऱ्याने आपले पीएम व संगायोची रक्कम बँकेने कर्जखात्याच्या व्याजापोटी कपात करून घेतल्याची गंभीर तक्रार केली आहे.

चौकट...

रक्कम परत देण्याची मागणी...

दरम्यान, या शेतकऱ्यांनी कळंब येथील तहसीलदार यांना यासंबंधी रितसर तक्रार दिली असून, यात पेरणीच्या तोंडावर आलेली ही रक्कम कपात केली आहे. तरी ती परत मिळावी, अशी मागणी केली आहे. यासंबंधी संबंधित बँकेच्या शाखाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कॉल स्वीकारला नाही.

Web Title: The amount of ‘honor’ goes to the loan account