आमदार निधीतून मिळाली तुळजापूरला रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:35 IST2021-02-09T04:35:08+5:302021-02-09T04:35:08+5:30

तुळजापूर : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आमदार निधीतून तुळजापूर शहरासाठी रुग्णवाहिका दिली असून, सोमवारी नगरपरिषद कार्यालयाकडे ही रुग्णवाहिका ...

Ambulance to Tuljapur received from MLA fund | आमदार निधीतून मिळाली तुळजापूरला रुग्णवाहिका

आमदार निधीतून मिळाली तुळजापूरला रुग्णवाहिका

तुळजापूर : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आमदार निधीतून तुळजापूर शहरासाठी रुग्णवाहिका दिली असून, सोमवारी नगरपरिषद कार्यालयाकडे ही रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मुख्यधिकारी आशिष लोकरे यांनी आ. पाटील यांचा सत्कार केला.यावेळी आमदार पाटील म्हणाले, लोक प्रतिनिधी म्हणून तुळजापूर शहराची गरज लक्षात घेऊन ही रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली आहे. नगरपरिषदेच्या वतीने डॉक्टर व वाहनचालक देण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत मुख्यमंत्री लवकर निर्णय घेतील. यासाठी उपोषण करण्याची वेळ येणार नाही.

या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी एस. जाधव, नगरसेवक पंडितराव जगदाळे, विजय कंदले, किशोर साठे, नागेश नाईक, अभिजित कदम, माऊली भोसले, विनोद गंगणे, सुहास साळुंके, नारायण नन्नवरे, गुलचंद व्यवहारे, शिवाजी भोसले, सागर कदम, विशाल रोचकरी, अविनाश गंगणे, आनंद कंदले, श्रीनाथ शिंदे, विनोद पंलगे, कुमार हंगरगेकर, न. प. कर्मचारी वैभव पाठक, महादेव सोनार, न.प. अभियंता प्रशांत चव्हाण, गुणवंत कदम, महेंद्र कावरे आदी उपस्थित होते.

Web Title: Ambulance to Tuljapur received from MLA fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.