शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

बघा ! हे असंही घडतंय, शेतकऱ्यानं 2 एकर 'कांदा' पिकात फिरवला रोटाव्हेटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 18:28 IST

कांदा पिकांच्या संदर्भात केवळ काळ्या आईची ओटी भरणं अन् वाढीसाठी

बालाजी अडसूळ 

एकीकडे कांद्याला मिळणाऱ्या उचांकी दराच्या कथा मांडल्या जात असतांनाच दुसरीकडे मात्र परतीच्या पावसाने वाया गेलेल्या कांदा फडावर 'नांगर' फिरवण्याची दुर्देवी वेळ काही कांदा उत्पादक शेतकर्यावर आली आहे.अशीच डोळ्यात पाणी आणणारी वेळ इटकूर येथील बापूराव आडसूळ यांच्यावर ओढवली असून दरवृद्धी चर्चेचा 'हिशोब' तेजीत असतांनाच आपल्या दोन एकर कांदा क्षेत्रावर रोटाव्हेटर फिरवले आहे.कांदा पिकांच्या संदर्भात केवळ काळ्या आईची ओटी भरणं अन् वाढीसाठी राब राब राबणं शेतकर्यांच्या हातात आहे. बाकी, त्यांला मिळणारी हवामान अन् पाऊसपाण्याची साथ, बाजारातील दर हे सारं काही परस्वाधीन आहे.यामुळेच हा कांदा, कधी उत्पादकांना रडवतो तर कधी त्यांच्या चेहर्यावर हास्य निर्माण करतो असा आजवरचा अनुभव आहे.इटकूर (ता कळंब )येथील बापूराव तुकाराम आडसूळ यांनी खरीप हंगामात दोन एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली होती.चागंली मेहनत व मशागत करूण पिक जोपासले होते.परंतु, पावसाळ्याच्या पुर्वार्धात टंचाईच्या झळा मागे लागल्या होत्या.यावर चाळीस पाईप अंथरून शेजारच्या शेतकर्याचे पाणी आणले अन् कांदा पिक वाचवले.मात्र ऐन मोक्याच्यावेळी कांदा क्षेत्राला परतीच्या अवकाळी पावसाने गाठले. यामुळे कांदा अन् त्याची मूळ मातीमध्येच नासले.वाढ खुंटली, पाती जळाल्या.बघता बघता संपुर्ण प्लॉट हातचा गेला. उभ्या पिकांवर फिरवला नांगर.... 

अवेळी आलेल्या पावसाने व यात जवळपास एक महिना सातत्य राहिल्याने बापूरावांच्या कांदा पिकाचे आतोनात नुकसान झाले होते.यामुळे काढणीस लावलेल्या मजूराचा खर्च ही निघाला नसता.बाजार दाखवण्या इतपतही माल निघण्याची शक्यता धुसर झाली होती.यामुळे अखेर त्यांनी आपल्या दोन एकर कांदा क्षेत्रावर रोटाव्हेटर फिरवून पिक मोडले आहे. लाखाचे बारा हजार ही नाहीत... सद्या कांदा दरवृद्धीच्या कथा शेतकर्यासांठी किती सुखद आहेत असे चीत्र दर्शवले जात असतांना बापूरावांचे मात्र लाखांचे बारा हजार ही झाले नसल्याचे दिसून येत आहे.त्यांनी २५ टन उत्पन्न व २० हजार रूपये टन असा दर गृहीत धरला होता.यानुसार चार ते पाच लाख उत्पन्न अपेक्षीत होते. मात्र, सद्या कांद्याला टनाला तर सोडा क्विंटलला वीस हजाराचा दर मिळाला आहे. मात्र, बापूरावांनी विकायचं काय ?. एकूणच, हे उदाहरण प्रातिनिधिक असले तरी शशिकांत गंभिरे, शिवाजी आडसूळ अशा अनेक कांदा शेतकर्यांचे 'लखपती' व्हायचं स्वप्न परतीच्या पावसाने धुळीस मिळवले आहे. विम्याचे कवच नाही, खरीप मदत तरी.... कांदा हातचा गेला असतांना दुसरीकडे सदर पिकांचा खरीप हंगाम कृषि विमा योजनेच्या अधिसूचित पिकांत समावेश नसल्याने कांद्याचा विमा भरता आलेला नाही.यामुळे बाधीत क्षेत्रासाठी शेतकर्यांना विमा नुकसान भरपाईचे कवच मिळणार नाही. यामुळे किमान शासनाच्या खरीप मदत वाटपात कांदा पिकांची फळपीकात नोंद घेवून वाढीव मदत द्यावी अशी मागणी बापूराव आडसूळ यांनी केली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीonionकांदाOsmanabadउस्मानाबाद