इटकूर येथेही आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:33 IST2021-03-31T04:33:27+5:302021-03-31T04:33:27+5:30
शेतकरी अडचणीत असतानाही महावितरण कंपनी सक्तीने वीज बिल वसुली करत आहे. यासाठी वीज पुरवठा खंडित करून वेठीस धरले जात ...

इटकूर येथेही आंदाेलन
शेतकरी अडचणीत असतानाही महावितरण कंपनी सक्तीने वीज बिल वसुली करत आहे. यासाठी वीज पुरवठा खंडित करून वेठीस धरले जात आहे. यामुळे ही वसुली थांबवावी या मागणीसाठी इटकूर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर भाजपच्या वतीने वीज देयकांची होळी करण्यात आली.
यावेळी भाजप कामगार चित्रपट आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, भाजप कळंब तालुका सरचिटणीस प्रदीप फरताडे, इटकूर गट प्रमुख महादेव पावले, ग्रामपंचायत सदस्य विनोद चव्हाण, सत्यदेव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी युवामोर्चा अध्यक्ष सचिन गंभीरे, किरण शिंदे , बालाजी मोटे, उमेश काथवटे, धनाजी गंभिरे, दत्ता कुंभार, संभाजी मोटे, केशव कस्पटे, बालाजी पारवे, पप्पू गाडे , जयदेव फरताडे , अभिजित गंभिरे , महेश हावळे, आदी उपस्थित हाेते.