शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

परंडा पाठोपाठ तुळजापुरातही उमेदवारांकडून ईव्हीएमच्या पडताळणीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 19:38 IST

निकालानंतर ७ दिवसांच्या आत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारांनाच मतदान पडताळणीची मागणी करता येते.

धाराशिव : नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय असल्याने पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीनच्या पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. यात परंडा मतदारसंघातून राहुल मोटे यांनी १७ तर वंचितचे प्रवीण रणबागुल यांनी एका मशीनच्या पडताळणीची मागणी केली आहे. दरम्यान, तुळजापूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार धीरज पाटील यांनीही तीन मशीनच्या पडताळणीची मागणी करीत त्यासाठीचे शुल्क भरले आहे.

परंडा विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे हे शिंदेसेनेचे तानाजी सावंत यांच्याकडून अवघ्या १५०९ मतांनी पराभूत झाले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सावंत यांना विजयाचे प्रमाणपत्रही देऊ केले आहे. दरम्यान, ईव्हीएम मशीनवर संशय असल्याने राहुल मोटे यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आयोगाच्या तरतुदीनुसार १७ ईव्हीएममधील बर्न्ट मेमरीची पडताळणी करण्याची लेखी मागणी केली आहे. यासाठी आवश्यक असलेले प्रति मशीन ४७ हजार २०० रुपयांचे शुल्कही त्यांनी भरले आहे. तसेच याच मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण रणबागुल यांनीही एका मशीनच्या पडताळणीची मागणी केली आहे. दरम्यान, तुळजापूर मतदारसंघातील ३ मशीनच्या पडताळणीसाठी काँग्रेसचे पराभूत उमेदवार धीरज पाटील यांनी शुल्क भरून मागणी केली आहे.

अशी आहे प्रक्रिया अन् तरतूद...निकालानंतर ७ दिवसांच्या आत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारांनाच मतदान पडताळणीची मागणी करता येते. त्यांच्याकडून एकूण मतदान केंद्राच्या ५ टक्के इतक्याच केंद्रावरील मशीनची पडताळणी मागता येते, अशी तरतूद आहे. त्यानुसार परंडा मतदारसंघात ५ टक्के प्रमाणे १८ केंद्र होतात. या सर्व १८ केंद्रांच्या पडताळणीची मागणी करण्यात आली आहे. तुळजापूरमध्ये ५ टक्केप्रमाणे २० केंद्र होतात. मात्र, धीरज पाटील यांनी केवळ ३ केंद्रांची मागणी केली आहे.

आता पुढे काय होणार...उमेदवारांकडून प्राप्त झालेले अर्ज ५ दिवसांत निवडणूक आयोगाकडे पाठविले जातील. यानंतर आयोगाकडून ईव्हीएम निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना तंत्रज्ञ, अभियंत्यांना पडताळणीसाठी संबंधित मतदारसंघात पाठविण्याची सूचना केली जाईल. कंपनीकडून मिळणाऱ्या तारखेनुसार संबंधित मतदारसंघातील मागणी केलेल्या ईव्हीएममधील बर्न्ट मेमरीची पडताळणी केली जाईल. ही सर्व प्रक्रिया ४५ दिवसांच्या आत करावी लागेल. त्यामुळे पडताळणीनंतर काय अहवाल समोर येतो, याकडे मतदारांचे लक्ष असणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024dharashivधाराशिवparanda-acपरांडाtuljapur-acतुळजापूर