शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

वडिलांच्या निधनानंतर आईनं मोलमजुरी करुन शिकवलं, सी.ए. परीक्षा पास होऊन पोरानं पांग फेडलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 7:50 PM

गोपाळ 10 वर्षाचा असताना त्याचे वडिल अनुरथ यांचे निधन झाले होते. त्यानंतर आई इंदूबाई जगताप यांनी शेतमजुरी करून मोठ्या कष्टाने पोराला शिकवलं.

उस्मानाबाद - तालुक्यातील नितळी येथील एका शेतमजुराच्या मुलाने सी.ए.ची परीक्षा पास केली. गोपाळ जगताप असे याचं नाव असून गोपाळच्या या देदिप्यमान यशानंतर गावासह जिल्हाभरात त्याचं कौतुक होत आहे. तर, गोपाळच्या यशानंतर पोरानं आईच्या कष्टाचं चीज केलं, अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. गोपाळच्या या यशाबद्दल सरपंच अन् गावाकडून त्याचा सत्कार करण्यात आला. 

गोपाळ 10 वर्षाचा असताना त्याचे वडिल अनुरथ यांचे निधन झाले होते. त्यानंतर आई इंदूबाई जगताप यांनी शेतमजुरी करून मोठ्या कष्टाने पोराला शिकवलं. गोपाळला तीन बहिणी असून त्यांच्या पालन पोषणासह लग्नाच खर्चही आईने मोठ्या हिमतीने उचलला. विशेष म्हणजे तीन मुलींचे लग्न करून गोपाळला उच्च शिक्षणापर्यंत पोहोचविण्याचं कामही या माऊलीनं खंबीरपणे पूर्ण केलं. गोपाळच्या शिक्षणाचा खर्च भागवणे हे इंदूमती जगताप यांच्यासमोर आव्हान होते, तरी ही माता डगमगली नाही. त्यामुळेच आपल्या आईचे कष्टही गोपाळला पावलोपावली जाणवत होते. त्यामुळेच गोपाळनेही मोठ्या जिद्दीने आईच्या कष्टाचे चीज केलं. आईचं स्वप्न पूर्ण करत, गोपाळने सीएचीपरीक्षा पास केली. गोपाळचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले असून अकरावी आणि बारावी कॉमर्स शिक्षण उस्मानाबादच्या आर.पी. कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर सी. ए. पदवीसाठी गोपाळने सन 2010 मध्ये पुणे गाठलं. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्याने सी.ए. होण्याचे स्वप्न साकार केलं. पती वारल्यानंतर न डगमगता मुलांचे पालन पोषण करणाऱ्या माता इंदूमती यांचा आणि आईचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून सी.ए. परीक्षा पास होणाऱ्या गोपाळचा गावकऱ्यांकडून सत्कार होत आहे. आपल्या लेकराचा गावाकडून होणारा सत्कार पाहून त्या माऊलीचं डोळे न पाणावतील तर नवलंच. गोपाळच्या उत्तुंग यशाबद्दल गावचे सरपंच बबन सुरवसे, मुख्याध्यापक पी.बी. आडसूळ यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार करून गोपाळच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. त्यावेळी माऊली इंदूबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते.  

टॅग्स :examपरीक्षाchartered accountantसीएOsmanabadउस्मानाबाद