१६ बाधितांची भर, २३ जणांना मिळाला डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:33 IST2021-01-25T04:33:04+5:302021-01-25T04:33:04+5:30
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व कोरोनासदृश लक्षणे असलेल्या २२६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. ते सर्वच स्वॅबचे ...

१६ बाधितांची भर, २३ जणांना मिळाला डिस्चार्ज
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व कोरोनासदृश लक्षणे असलेल्या २२६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. ते सर्वच स्वॅबचे अहवाल जिल्हा रुग्णालयास शनिवारी प्राप्त झाले. यात ११ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. शिवाय, १४२ व्यक्तींची रॅपिड ॲँटिजेन टेस्ट करण्यात आली. यातील ५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. बाधितांमध्ये उमरगा व वाशी तालुक्यात प्रत्येकी १, परंडा, लोहारा तालुक्यात प्रत्येकी २, तुळजापूर, कळंब प्रत्येकी ३ उस्मानाबाद तालुक्यात ४ रुग्णांचा समावेश आहे. तर दुसरीकडे दिवसभरात २३ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १२५ इतकी आहे.
रिकव्हरी रेट ९५.८५टक्के
जिल्ह्यात मागील साडेनऊ महिन्याच्या कालावधीत १ लाख १५ हजार ७१ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. १६ हजार ८०२ व्यक्तींना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले, यातील ५७२ रुग्णांचा मृत्यू झाला. १६ हजार १०५ जण उपचाराअंती बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९५.८५ टक्के इतके आहे.