२७१ वाहनचालकांविरूद्ध कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:33 IST2021-03-31T04:33:29+5:302021-03-31T04:33:29+5:30
उस्मानाबाद - वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी २७१ वाहनचालकांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांच्याकडून दंडापाेटी सुमारे ५७ हजार रूपये ...

२७१ वाहनचालकांविरूद्ध कारवाईचा बडगा
उस्मानाबाद - वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी २७१ वाहनचालकांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांच्याकडून दंडापाेटी सुमारे ५७ हजार रूपये वसूल करण्यात आले. ही कारवाई २९ मार्च राेजी जिल्ह्यातील अठरा पाेलीस ठाणी वाहतूक शाखेकडून करण्यात आली. कारवाईची ही माेहीम यापुढेही सुरू ठेवली जाणार असल्याचे वाहतूक शाखेने कळविले आहे.
जुगार अड्उ्यावर छापा, मुद्देमाल जप्त
उस्मानाबाद -तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पाेलिसांनी छापा मारला. २९ मार्च राेजी केलेल्या या कारवाईत सुमारे १५ हजार ९६० रूपये जप्त करण्यात आले. या प्रकरणी नळदुर्ग पाेलीस ठज्ञण्यात प्रताप महादेव देवकते यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.
अवैध मद्य विक्री, गुन्हा दाखल
उस्मानाबाद -वाशी तालुक्यातील मांडवा येथे अवैघ दारू विक्री करणार्याविरूद्ध २९ मार्च राेजी कारवाई करण्यात आली. यात सुमारे देशी-विदेशी दारूच्या ४५ बाटल्या व १५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी एका महिलेविरूद्ध वाशी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास वाशी पाेलीस करीत आहेत.
महिला प्रवाशाचा माेबाईल लंपास
उस्मानाबाद -येथील बसस्थानकातून परंडा तालुक्यातील खासापुरी येथील ऋतुजा प्रताप देशमुख यांच्या पर्समधील माेबाईल अज्ञाताने लंपास केला. ही घटना २९मार्च राेजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरूद्ध आनंदनगर पाेलीस ठाण्यात चाेरीचा गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.