शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

कारवाईदरम्यान पळून जाणाऱ्या लाचखोर पीआयला एसीबीच्या पथकाने पाठलाग करून पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 17:30 IST

लाच घेताना पकडल्यानंतर कारवाई सुरू असतानाच नजर चुकवून लाचखोर पीआयने पळ काढला.

धाराशिव : एका महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या माध्यमातून ९५ हजारांची लाच घेणारा धाराशिव ग्रामीण ठाण्याचा पोलिस निरीक्षक मारुती शेळके कारवाईदरम्यान वर्दळीच्या रस्त्याने पळून जात होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करीत त्यास बार्शी रोडवरून ताब्यात घेतले. गुरुवारी त्यास न्यायालयासमोर हजर केले असता शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

धाराशिव शहरातील एका तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी दोघांवर धाराशिव ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. यातील एका आरोपीच्या नातेवाइकाकडे गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिस निरीक्षक शेळके याने दोन लाखांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ९५ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. त्यानुसार बुधवारी शासकीय विश्रामगृहावर एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने तक्रारदार नातेवाइकाकडून ९५ हजार रुपये स्वीकारले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महिला कर्मचाऱ्यास रंगेहाथ ताब्यात घेऊन पोलिस निरीक्षक मारुती शेळके यासही ताब्यात घेतले. कारवाई सुरू असतानाच नजर चुकवून त्याने पळ काढला. वर्दळीच्या बार्शी रोडवरून हातगाडे, वाहनांच्या आडून जात असताना लेडीज क्लबसमोर पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले.

घरांची झडती सुरूलाचखोर मारुती शेळके व महिला कर्मचारी मुक्ता लोखंडे यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. शेळके याच्या नांदेडच्या काबरानगरमधील व धाराशिव येथील भाड्याने राहणाऱ्या घराची झडती घेतली जात आहे. यामध्ये अद्याप काहीच हाती लागले नसल्याचे लाचलुचपतचे उपअधीक्षक योगेश वेळापुरे म्हणाले..

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागdharashivधाराशिव