धाराशिवमध्ये ‘एसीबी’ची माेठी कारवाई; दीड लाख स्वीकारताना सहाय्यक नगररचनकारास पकडले
By बाबुराव चव्हाण | Updated: March 29, 2023 18:04 IST2023-03-29T18:03:52+5:302023-03-29T18:04:08+5:30
तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ शिवारातील साधारपणे ३ एकर शेतजमीन अकृषी करण्यासाठी घेतली लाच

धाराशिवमध्ये ‘एसीबी’ची माेठी कारवाई; दीड लाख स्वीकारताना सहाय्यक नगररचनकारास पकडले
धाराशिव -तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ शिवारातील तीन एकर शेतजमीन अकृषी करण्यासाठी सुमारे ६ लाखांची मागणी करून दीड लाख रूपये स्वीकारताना सहाय्यक नगररचनाकारास रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणात नगररचनाकारासही ‘लाचलुचपत’ प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ शिवारातील साधारपणे ३ एकर शेतजमीन अकृषी करण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला हाेता. या कामासाठी सुमारे सहा लाखांची मागणी करण्यात आली हाेती. तडजाेडीअंती सुमारे ५ लाख रूपये देण्याचे ठरले. या रकमेतील पहिला हप्ता म्हणून दीड लाख रूपये स्वीकारताना मंगळवारी सहाय्यक रचनाकार केंद्रे यांना रंगेहात पकडण्यात आले. ‘लाचलुचपत’ने या प्रकरणात नगररचनाकार देशपांडे यांनाही ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादीच्या एका पदाधिकार्याने ही तक्रार दाखल केली हाेती.