नऊ महिन्यांत उत्पादन शुल्कच्या ९७ कारवाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:16 IST2021-02-05T08:16:31+5:302021-02-05T08:16:31+5:30
उस्मानाबाद : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या काळात करण्यात आलेल्या कारवाईत ९७ गुन्हे ...

नऊ महिन्यांत उत्पादन शुल्कच्या ९७ कारवाया
उस्मानाबाद : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या काळात करण्यात आलेल्या कारवाईत ९७ गुन्हे नोंदविण्यात आले असून, ७७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. हातभट्टी रसायन, देशी, विदेशी मद्य असे एकूण १७ लाखांच्या मुद्देमालासह नऊ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
यंदा लॉकडाऊन काळात शासनाने उद्योग, व्यवसाय, शासकीय, खासगी आस्थापना बंद केल्या होत्या. मद्यविक्रीही लॉकडाऊन काळात एक महिना बंदच होती. त्याचा फटका शासनाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाला बसला होता. राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाल्याने शासनाने महसूल वाढीच्या सूचना विविध विभागांना केल्या होत्या. त्यानंतर बीअर शॉपी, दारू दुकाने सुरू करण्यात आली होती.
कोरोना काळातही अवैध मद्यविक्रीस चाप बसावा, यासाठी उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम राबविली होती. अवैध पद्धतीने मद्याची चोरटी वाहतूक करणाऱ्याविरुद्ध उत्पादन शुल्क विभागाच्या चार पथकांमार्फत कारवायांचा बडगा उगारण्यात येत आहे. नऊ महिन्यांत ९७ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ७७ आरोपी अटक करण्यात आले आहेत. १४५८ लिटर हातभट्टी, १४ हजार लिटर रसायन, ६४७ लिटर देशी दारू, ३०५ लिटर वदेशी मद्य जप्त केले. मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली नऊ वाहने जप्त करण्यात आली आहेत. १७ लाख ३६ हजार ८४१ रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
कोट...
मागील नऊ महिन्यांत ९७ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ७७ आरोपींना अटक करण्यात आले असून, नऊ वाहने जप्त केली आहेत. हातभट्टी व गोवा राज्यातील बनावट मद्य मानवी आरोग्यास धोकादायक असल्याने अशा प्रकारची मद्य विक्री करणाऱ्यांवर कारवाया केल्या जात आहेत.
जितेंद्र गोगावणे,
उत्पादन शुल्क अधीक्षक, उस्मानाबाद