शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

कार्डवरील चार आकडे सांगितले; बँक खात्यातून ७० हजार गायब झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 3:03 AM

चार अंक सांगताच दोन मिनिटांत ७० हजार रुपये बँक खात्यावरून गायब झाल्याचा प्रकार पानगाव येथील एका तरुणाच्या नशिबी आला.

कळंब (जि. उस्मानाबाद) : तुमच्याकडील क्रेडिट कार्ड तुमचेच आहे का, याची खात्री करावी लागेल व यासाठी कार्डचे शेवटचे चार क्रमांक सांगा, अशी एक तरुणी मोबाईलवर बोलली. यावर विश्वास ठेवत चार अंक सांगताच दोन मिनिटांत ७० हजार रुपये बँक खात्यावरून गायब झाल्याचा प्रकार पानगाव येथील एका तरुणाच्या नशिबी आला. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पानगाव येथील अनिल गंगाधर चौधरी हे कळंब येथे फायनान्स कंपनीत एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीला आहेत. गुरुवारी दुपारी त्यांना अनोळखी नंबरवरून एका तरुणीचा कॉल आला.  तुमच्या क्रेडिट कार्डला इन्शुरन्स आहे. त्यासाठी १२० रुपये प्रतिमहिना भरावा लागत होता. तो आता ७५० रुपये भरावा लागेल,’ असे सांगितले.यावर चौधरी यांनी मला हा  इन्शुरन्स नको, असे प्रत्युत्तर दिले.  मग इन्शुरन्स बंद करण्यासाठी आपल्या क्रेडीट कार्डचे शेवटचे चार अंक सांगा, असे तरुणीने सांगितले. त्यानुसार चौधरी यांनी क्रेडिट कार्डचे शेवटचे चार अंक सांगितले. दोन टप्यांत गेले पैसेअंक सांगताच काही क्षणातच त्यांच्या खात्यातून ५० हजार २२५ रुपये वजा झाल्याचा संदेश आला. या धक्क्यातून सावरतात न् सावरतात तोच दोन मिनिटांनी आणखी २० हजार ५०० रुपये काढल्याचा संदेश आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.