५४ बाधितांची भर, ४१ जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:34 IST2021-09-19T04:34:14+5:302021-09-19T04:34:14+5:30

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व कोरोनासदृश लक्षणे असलेल्या व्यक्तींची कोरोना टेस्ट करण्यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे. शुक्रवारी ५८० ...

54 injured, 41 discharged | ५४ बाधितांची भर, ४१ जणांना डिस्चार्ज

५४ बाधितांची भर, ४१ जणांना डिस्चार्ज

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व कोरोनासदृश लक्षणे असलेल्या व्यक्तींची कोरोना टेस्ट करण्यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे. शुक्रवारी ५८० जणांचा आरटीपीसीआर अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला. यामध्ये २४ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तसेच १ हजार ६९ जणांची रॅपिड ॲँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ३० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. अशा एकूण ५४ जणांची भर पडली. बाधितांमध्ये उस्मानाबाद तालुक्यात १८, कळंब, वाशी तालुक्यात प्रत्येकी ९ रुग्ण, परंडा ८, लोहारा ४, उमरगा ३, तुळजापूर २, भूम तालुक्यात १ रुग्ण आढळून आले. तर ४१ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५३० आहे. कोरोनाचा संसर्ग अद्याप टळलेला नसल्याने नागरिकांनी, स्वच्छ हात धुणे, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रींचे पालन करावे. तसेच कोरोना आजाराचे लक्षण आढळताच त्वरित नजीकच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: 54 injured, 41 discharged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.