४० बसेस ‘कोरोना फ्री’; प्रवासी मात्र बेफिकीर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:39 IST2021-09-17T04:39:08+5:302021-09-17T04:39:08+5:30
गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत चार ते पाच महिने एसटीची बससेवा ...

४० बसेस ‘कोरोना फ्री’; प्रवासी मात्र बेफिकीर !
गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत चार ते पाच महिने एसटीची बससेवा बंद होती. रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर बससेवा सुरळित झाली. मात्र, कोरोनाचा धोका टळला नसल्याने नागरिक प्रवास करणे टाळत होते. प्रवाशाच्या सुरक्षेसाठी महामंडळाने बसेस ॲन्टी मायक्रोबियल कोटिंग करण्याचे काम हाती घेतले. कोटिंग झालेल्या बसेसमधून प्रवास करणे सुरक्षित मानले जात आहे. जिल्ह्यात ४० बसचे कोटिंगचे काम झाले आहे. तर २३२ बसेसचे काम सुरु आहे.
एका एसटीला वर्षातून सहावेळा होणार कोटिंग
उस्मानाबाद विभागाच्या एकूण सव्वा चारशेच्या जवळपास बसेस आहेत. यापैकी २७२ बसेसचे ॲन्टी मायक्रोबियल कोटिंग केेले जात आहे. ४० बसेसचे कोटिंगचे काम पूर्ण झाले आहे. या बसेसचे दर दोन महिन्यानी कोटिंग करण्यात येणार आहे. असे एकूण वर्षात ६ वेळेस कोटिंग केली जाणार आहे.
बाधित व्यक्ती उठून गेल्यानंतर धोका नाही, पण बाजूलाच बसला असल्यास?
कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. बसमध्ये आसनाच्या बाजूलाच बाधित व्यक्ती बसला असेल तर स्वत: मास्क लावावा व संबंधित व्यक्तीस मास्क लावण्यास सांगावे.
कोट...
उस्मानाबाद विभागातील २७२ बसेसचे ॲन्टी मायक्रोबियल कोटिंग प्रक्रिया केली जात आहे. सध्या ४० बसेसचे कोटिंग पूर्ण झाले आहे. कोटिंगमुळे थुंकीतून, शिंकातून जंतूसंसर्ग फैलावणार नाही. वर्षातून सहा वेळा एका बसचे कोटिंग केले जाईल.
अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक, उस्मानाबाद
प्रवासी काय म्हणतात..
कोरोना काळात प्रवास करणे धोक्याचे वाटते. त्यामुळे प्रवास करणे टाळत होतो. आता एसटीने कोटिंग केल्याने बसमधून प्रवास करणार आहे. सोबतच मास्कचा वापरही सुरुच ठेवणार.
अमोल गायकवाड, प्रवासी
रुग्ण संख्या कमी झाल्याने एसटीची बससेवा सुरु आहे. या कोरोनाचा संसर्गाचा धोका अद्याप धोका टळला नाही. त्यामुळे प्रवास करताना मास्क नियमित वापर करीत आहे. कोटिंगमुळे अन्य वाहनाच्या तुलनेत बसच्या प्रवासास पसंती देणार.
अनिकेत वाघमारे, प्रवासी