शनिवारी आढळले २२४ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:31 IST2021-03-28T04:31:10+5:302021-03-28T04:31:10+5:30
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व कोरोनासदृश लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी आरोग्य विभागाच्या वतीने केली जात आहे. शनिवारी ...

शनिवारी आढळले २२४ कोरोनाबाधित
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व कोरोनासदृश लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी आरोग्य विभागाच्या वतीने केली जात आहे. शनिवारी आरटीपीसीआर चाचणीत ७० जण कोरोना पॉझिटिव्ह आले. तर रॅपिड ॲँटिजेन टेस्टमध्ये १५४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. अशा एकूण २२४ रुग्णांची दिवसभरात नोंद झाली. बाधितांमध्ये उस्मानाबाद तालुक्यात ८६, तुळजापूर १६, उमरगा ३५, लोहारा १२, कळंब १८, वाशी १८, भूम १३, परंडा २६ अशा एकूण २२४ रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, ९० रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा १९ हजार ६१७ वर पोहोचला आहे. यातील ५९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १७ हजार ५३६ जण उपचाराअंती बरे झाले आहेत. सध्या १ हजार ४८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.