नऊ जागांसाठी २२ जण रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:27 IST2021-01-14T04:27:31+5:302021-01-14T04:27:31+5:30
चालकांवर गुन्हे उस्मानाबाद : सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे वाहन उभे करणाऱ्या चालकांवर जिल्ह्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. बालाजी पवार ...

नऊ जागांसाठी २२ जण रिंगणात
चालकांवर गुन्हे
उस्मानाबाद : सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे वाहन उभे करणाऱ्या चालकांवर जिल्ह्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. बालाजी पवार यांनी एमएच १२/ ईएफ ९६२८ हे वाहन परंडा शहरातील चौकात तर मनसूर लोहार यांनी एमएच ०२/ वायओ ५२१४ हे वाहन वाशी येथील शिवाजी नगर रस्त्यावर उभे केले होते. तसेच विलास वानगोता यांनी अनाळा येथील आपल्या दुकानासमोरील रस्त्यावर ग्राहकांची वाहने उभी केल्याने व जलिल मुल्ला यांनी येणेगूर येथील बाजारात वाहन लावल्याने संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
४५ हजार रुपये लंपास; गुन्हा दाखल
मुरूम : घरात खुर्चीवर ठेवलेल्या पँटीच्या खिशातून ४५ हजार रुपये चोरीस गेल्याची घटना येथे घडली. येथील शरणप्पा मेनसे यांच्या घरात त्यांचा मित्र गुंडप्पा बसवप्पा पोमाजी (रा. अक्कलकोट) हे १० व ११ जानेवारीच्या रात्री खोलीचा दरवाजा उघडा ठेवून झोपले होते. यावेळी अज्ञाताने खोलीतील खुर्चीवर ठेवलेल्या पँटच्या खिशातून ही रक्कम पळविली. याप्रकरणी पोमाजी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.