गौरी गणपती सजावट स्पर्धेत २०४ गृहिणींचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST2021-09-18T04:35:17+5:302021-09-18T04:35:17+5:30
मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान व शिवशंभु युवा प्रतिष्ठान यांनी ग्रामीण महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रतिष्ठानच्या सचीव स्वाती महेश टेळे ...

गौरी गणपती सजावट स्पर्धेत २०४ गृहिणींचा सहभाग
मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान व शिवशंभु युवा प्रतिष्ठान यांनी ग्रामीण महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रतिष्ठानच्या सचीव स्वाती महेश टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या गौरी गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर करुन एका कार्यक्रमात विजेत्यांना पारितोषिक वितरीत करण्यात आले.दाभा येथील हनुमान मंदिरात बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी शिराढोणचे एपीआय वैभव नेटके,पत्रकार अमोल चंदेल, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष प्रा. वर्षा जाधव, सरपंच बाबा टेळे पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष फकिरजी टेळे, शिवव्याख्याते कुलदीप गायकवाड, पोलीस पाटील रावसाहेब टेळे, ॲड. प्रदीप टेळेपाटील,आकाश टेळे आदींची उपस्थित होती. सजावटीची पारंपरिक व आकर्षक सजावट, स्वच्छता, रांगोळी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक संदेश या पाच निकषावर परिक्षण करत उत्कृष्ट स्पर्धाकांची निवड करण्यात आली. याप्रसंगी महेश टेळे, शिवशंकर होनराव, ओमकार इरकर, सुभाष टेळे, अशोक पटणे, भैरवनाथ सावंत, इंद्रजीत टेळे, बसलींग स्वामी, सुधाकर जाधव यांचाही गोविंद टेळे यांनी सन्मान केला. कार्यक्रमासाठी दत्तात्रय टेळे, गणेश लोमटे,संदीपान जाधव, राजाभाऊ होनराव यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन महेश टेळे आणि आभार ॲड. प्रदीप टेळे यांनी मानले.
चौकट...
या ठरल्या बक्षिसाच्या मानकरी...
या स्पर्धेत भागीर्थी लक्ष्मण लोमटे यांनी प्रथम,सोजरबाई फकिरजी टेळे यांनी द्वितीय, सुनीता बालाजी इरकर यांनी तृतीय,कविता बाळासाहेब सावंत यांनी चतुर्थ तर आणि पाचवा क्रमांक आश्विनी आत्माराम शिंदे यांनी मिळवला आहे.उत्तेजनार्थ म्हणून विश्वनाथ इरकर, शिवकन्या स्वामी, सुलन टेळे, लोपाबाई टेळे, शिवानी लोंढे, लक्ष्मीबाई टेळे, हिरकणा टेळे,भागीरथी जाधव, बालिका भिसे,सखुबाई साबळे आणि कुसुमबाई स्वामी यांना गौरविण्यात आले.पैठणी, मिक्सर, पूजाताट अशी विविध बक्षिसे यावेळी ठेवण्यात आली होती.