लोकशाही दिनात १८ तक्रारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:17 IST2021-02-05T08:17:33+5:302021-02-05T08:17:33+5:30

निपटारा करून अहवाल देण्याचे आदेश तुळजापूर : वाढीव वीजबिल, डीपी नादुरुस्त, घरकुल, जनसुविधा योजना, फेरफार, पीकपाणी अद्यावत करणे यासह ...

18 complaints filed on Democracy Day | लोकशाही दिनात १८ तक्रारी दाखल

लोकशाही दिनात १८ तक्रारी दाखल

निपटारा करून अहवाल देण्याचे आदेश

तुळजापूर : वाढीव वीजबिल, डीपी नादुरुस्त, घरकुल, जनसुविधा योजना, फेरफार, पीकपाणी अद्यावत करणे यासह विविध विभागांशी संबंधित १८ तक्रारी अर्ज तहसील कार्यालयातील लोकशाही दिनात दाखल झाले. त्या तक्रारी संबंधित विभागास वर्ग करून, त्यांचा निपटारा करून ७ दिवसांच्या आत अहवाल देण्याचे आदेश तहसीलदार सौदागर तांदळे यांनी काढले दिले आहेत.

तुळजापूर तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली हा लोकशाही दिन पार पडला. यावेळी तक्रारदारांच्या अर्ज नोंदवून घेतल्यानंतर शासनाचा टोकन नंबर देऊन पोहच पावती देण्यात येत होती. लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा आढावा घेऊन तक्रार अर्ज संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले असून, त्या सर्व तक्रार अर्जावर संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करून त्याचा अहवाल येत्या ७ दिवसात सादर करण्याचे आदेश तहसीलदारांनी संबंधित विभागाला दिले आहेत. यावेळी गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, तालुका कृषी अधिकारी एन. टी. गायकवाड, महसूल नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदेसह आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोट.....

लोकशाही दिनाच्या माध्यमातून जनसामान्यांचे अनेक प्रश्न सुटले जातील. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी असाच लोकशाही दिन घेतला जाणार आहे. यावेळी सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार असल्याने नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा होणार आहे.

- सौदागर तांदळे, तहसीलदार

Web Title: 18 complaints filed on Democracy Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.