तामलवाडीत कोरोना योद्धा पुरस्काराने १७ जन सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:34 IST2021-09-03T04:34:11+5:302021-09-03T04:34:11+5:30

तामलवाडी : कोरोनासारख्या महामारीत देवदूताप्रमाणे सेवा करून गाव कोरोनामुक्त्त ठेवण्यासाठी सलग दीड वर्ष अखंडपणे सेवा देणाऱ्या १७ जणांना ...

17 people honored with Corona Warrior Award in Tamalwadi | तामलवाडीत कोरोना योद्धा पुरस्काराने १७ जन सन्मानित

तामलवाडीत कोरोना योद्धा पुरस्काराने १७ जन सन्मानित

तामलवाडी : कोरोनासारख्या महामारीत देवदूताप्रमाणे सेवा करून गाव कोरोनामुक्त्त ठेवण्यासाठी सलग दीड वर्ष अखंडपणे सेवा देणाऱ्या १७ जणांना बाजार समितीचे संचालक यशवंत लोंढे यांच्या राणा प्रतिष्ठानकडून कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती मल्लिकार्जुन मसुते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, माजी सरपंच दत्तात्रय वडणे, बस्वराज मसुते, बाजार समितीचे संचालक यशवंत लोंढे, ज्ञानेश्वर पाटील हे उपस्थित हाेते.

काेराेनाच्या पहिल्या तसेच दुसऱ्या लाटेत शहरी, तसेच ग्रामीण भागातील जनता भयभीत झाली हाेती. अशा संकटकाळात काेराेना स्वत:चा जीव धाेक्यात घालून काेराेना याेद्धयांनी सेवा दिली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राणा प्रतिष्ठानच्या वतीने स्थानिक १७ जणांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास शहाजी लोंढे, आबास पटेल, बाळासाहेब जगताप, ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील, आप्पा रणसुरे, जितेंद्र माळी, अनिता पाटील, माजी सरपंच ज्ञानेश्वर माळी, चेअरमन दादाराव पवार, शीतल गायकवाड, सिकंदर बेगडे, स्नेहल राऊत, ज्ञानेश्वर सरडे, मुख्याध्यापक सुभाष जाधव, पांडुरंग पठाडे, मारुती रोकडे, भाऊ घोटकर, राघवेंद्र चाबुकस्वार, आदींची उपस्थिती हाेती. सुहास वडणे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

चौकट

लोंढे याचा सत्कार

तुळजापूर बाजार समितीचे संचालक व राणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यशवंत लोढे यांचाही यावेळी सरस्वती विद्यालयाच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला.

चौकट -

यांचा झाला सन्मान...

राणा प्रतिष्ठानच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, डॉ. अमर मगर, संतोष मगर, अविनाश गायकवाड, आरोग्यसेविका संगीता चव्हाण, अंगणवाडी कार्यकर्ती अंबुबाई तेलंग, सविता पाटील, ज्याेती गवळी, विजया रणसुरे, वर्षा कुलकर्णी, आशा कार्यकर्ती अनिता लोखंडे, स्वप्ना शिंदे, संगीता रणसुरे, जामाबाई करंडे, स्वच्छता कर्मचारी भारत रणसुरे, रहेमान जमादार, शिवाजी माळी, पोलीस कर्मचारी आकाश सुरनर, आदींचा काेराेना याेद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

Web Title: 17 people honored with Corona Warrior Award in Tamalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.