१५ लाख परत मागितले म्हणून मित्राला संपवले; कपडे, बूट काढून घेत मृतदेह फेकला नाल्यात
By बाबुराव चव्हाण | Updated: January 11, 2024 16:32 IST2024-01-11T16:31:50+5:302024-01-11T16:32:14+5:30
खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मित्राचे कपडे, बुट साेबत नेले

१५ लाख परत मागितले म्हणून मित्राला संपवले; कपडे, बूट काढून घेत मृतदेह फेकला नाल्यात
धाराशिव : दिलेले पंधरा लाख रूपये परत मागितल्यामुळे संतप्त हाेवून एकाने ३७ वर्षीय व्यक्तीच्या डाेक्यात धारदार हत्याराने वार करून मुडदा पाडला. यानंतर मृतदेह तुराेरी गावच्या शिवारातील नाल्यात फेकून दिला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताच्या अंगावरील कपडे तसेच बुट साेबत नेले. या प्रकरणी बुधवारी उमरगा पाेलीस ठाण्यात संबंधिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
बिदर जिल्ह्यातील हुमानाबाद येथील संताेष पापन (आराेपी) व असिफ मुस्तफा खान (३७) हे दाेघे साेमवारी दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास एकाच कारधमून उमरगा येथे काेर्ट पेशीसाठी आले हाेते. प्रवास सुरू असतानाच असिफ खान यांनी दिलेले पंधरा लाख रूपये पापन यांच्याकडे मागणी केले. यातून दाेघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. दाेघांतील वाद वाढत जावून पापन याने असिफ खान यांच्या डाेक्याात धारदार हत्याराने वार केला. या घटनेत गंभीर जखमी हाेवून त्याचा मृत्यू झाला.
यानंतर पापन याने हा मृत्तदेह महामार्गालगत असलेल्या तुराेरी शिवारातील एका नाल्यामध्ये फेकून दिला.पुरावा नष्ट करण्यासाठी आराेपी मयताच्या अंगावरील कपडे तसेच बुट साेबत घेऊन गेला. दरम्यान, थरारक घटना मंगळवारी सकाळी नऊ वाजता उघडकीस आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उमर मुस्तफा खान यांनी उमरगा पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून १० जानेवारी राेजी उशिरा आराेपी संताेष पापन याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास उमरगा पाेलीस करीत आहेत.
पुरावा नष्ट करूनही...
दिलेले पंधरा लाख रूपये परत मागितल्याच्या रागातून थेट धारदार हत्याराने डाेक्यात वार करून मुदा पाडला. हा मृतदेह महामार्गालगतच्याच एका नाल्यात फेकला. यानंतर आराेपीने पुरावा नष्ट करण्यासाठी चक्क मयताच्या अंगावरील कपडे तसेच पायातील बूट घेऊन घटनास्थळावरून पाेबारा केला. यानंतरही आराेपीची ओळख पटविण्यात पाेलीस यशस्वी झाले.