शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

कानपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड जफर हयातला अटक, फेसबुक पोस्टद्वारे लोकांना भडकावल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 19:06 IST

Kanpur Violence :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी जफर हयात हाश्मी याने फेसबुक पोस्टद्वारे लोकांना कानपूरमधील बाजार बंद करून जेल भरो आंदोलन करण्याचे आवाहन केले होते.

दिल्ली : उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झालेल्या हिंसाचाराचा मास्टरमाइंड जफर हयात हाश्मी याला पोलिसांनीअटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी 3 एफआयआर नोंदवले आहेत. 36 ज्ञात आणि 1500 अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी जफर हयात हाश्मी याने फेसबुक पोस्टद्वारे लोकांना कानपूरमधील बाजार बंद करून जेल भरो आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) आनंद प्रकाश तिवारी यांनी सांगितले की, 18 जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनांशी संबंध असून काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.पोलीस अधिकारी पुढे म्हणाले, "परिस्थिती शांततापूर्ण आहे आणि आम्ही चोवीस तास त्यावर लक्ष ठेवून आहोत." सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी काल रात्री किमान 12 संशयितांना ताब्यात घेतले. तिवारी पुढे म्हणाले की, बेकनगंज पोलीस ठाण्यात दंगल आणि हिंसाचारासाठी 500 हून अधिक लोकांविरुद्ध तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.पहिला एफआयआर स्टेशन प्रभारी (बेकनगंज) नवाब अहमद यांनी सुमारे 500 लोकांविरुद्ध नोंदवला आहे आणि त्यांच्यावर प्राणघातक शस्त्रांनी दंगल केल्याचा आरोप केला आहे. शुक्रवारच्या नमाजानंतर लगेचच झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात मौलाना मोहम्मद अली (एमएमए) जौहर फॅन्स असोसिएशनचे प्रमुख हयात जफर हाश्मी, त्यांचे सहकारी युसूफ मन्सूरी आणि अमीर जावेद अन्सारी यांच्यासह 36 जणांची एफआयआरमध्ये नावे आहेत. एसएचओने सांगितले की, हयात आणि त्याच्या समर्थकांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह टिपण्णीचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, दंगलखोरांनी प्राणघातक शस्त्रे वापरली, पेट्रोल बॉम्ब फेकले आणि रस्त्यावर गोंधळ घातला, ज्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली.पोलिस उपनिरीक्षक (एसआय) आसिफ रझा यांनी नोंदवलेल्या दुसऱ्या एफआयआरमध्ये, दंगलीच्या संदर्भात 350 अनोळखी लोकांव्यतिरिक्त 20 जणांची नावे घेऊन एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एसआयने आपल्या एफआयआरमध्ये आरोप केला आहे की, एमएमए जौहर फॅन्स असोसिएशनचे प्रमुख हयात जफर हाश्मी, युसूफ मन्सूरी, अमीर जावेद अन्सारी आणि इतर दादा मियांसह चौकाचौकात जमले आणि यतीम-खाना परिसरात दुकानदारांना त्यांची दुकाने बंद करण्यास भाग पाडले. त्यामुळे अराजकता पसरली.तिसरा एफआयआर चंदेश्वर हाटा रहिवासी मुकेश यांनी दाखल केला आहे, ज्याने आरोप केला आहे की, शेकडो मुस्लिमांनी इतर समाजातील लोकांवर लाठ्या, लोखंडी सळ्या आणि प्राणघातक शस्त्रे, पेट्रोल बॉम्ब आणि दगडफेक करून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ले केले. एफआयआरमध्ये "हजारो अज्ञात व्यक्तींच्या जमावाचा" आरोपी म्हणून उल्लेख आहे.भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी नुकत्याच टीव्हीवरून प्रसारित झालेल्या चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारच्या नमाजानंतर जबरदस्तीने दुकानं बंद करू लागले, तेव्हा परेड, नई सडक आणि यतीमखाना भागात निर्माण झालेल्या संघर्षांमध्ये पोलिस कर्मचार्‍यांसह किमान 40 लोक जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकFacebookफेसबुक