दुबईतून पाकिस्तानमार्गे आलेल्या तरुणास दिल्ली विमानतळावरून अटक, खळबळजनक खुलासे

By पूनम अपराज | Published: December 25, 2020 08:22 PM2020-12-25T20:22:35+5:302020-12-25T20:25:11+5:30

Crime News : देशद्रोहाचा आरोप असून त्याचे अनेक खुलासे झाले

A youth who came from Dubai via Pakistan was arrested from Delhi airport | दुबईतून पाकिस्तानमार्गे आलेल्या तरुणास दिल्ली विमानतळावरून अटक, खळबळजनक खुलासे

दुबईतून पाकिस्तानमार्गे आलेल्या तरुणास दिल्ली विमानतळावरून अटक, खळबळजनक खुलासे

Next
ठळक मुद्देतो दुबईतून पाकिस्तानमार्गे दिल्ली विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी आरोपीला विमानतळातूनच अटक केली. मूळचा भैन्सवाल गावचा विकास वर्मा उर्फ ​​मोहम्मद विकास, जो आता संबंधित पोलीस स्टेशन परिसरातील सेक्टर -10 स्थित वर्धमान गार्डनिया येथील राहत असून तो परदेशातील व्यक्तीच्या संपर्कात 

पाकिस्तानमधील एका संघटनेशी संपर्क साधल्यानंतर सोनीपत सदर पोलिस ठाण्यात परिसरात राहणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर आरोपी दुबईहून पाकिस्तानात पळून गेला. मात्र, तो दुबईतून पाकिस्तानमार्गे दिल्ली विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी आरोपीला विमानतळातूनच अटक केली.

त्याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे आणि त्याला रिमांडवर घेण्यात आले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकरण उजेडात येईल. मूळचा भैन्सवाल गावचा विकास वर्मा उर्फ ​​मोहम्मद विकास, जो आता संबंधित पोलीस स्टेशन परिसरातील सेक्टर -10 स्थित वर्धमान गार्डनिया येथील राहत असून तो परदेशातील व्यक्तीच्या संपर्कात आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. तो देशद्रोहाचा कट रचत आहे. जून महिन्यात पोलिसांनी त्याच्याविरूद्ध माहिती मिळाली. पाकिस्तानमधील जमावाशी त्याचा संपर्क झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

नंतर पोलिसांना कळले की, आरोपी दुबईहून पाकिस्तानात गेला आहे. तेथे त्याने एका पाकिस्तानी मुलीशी लग्न केले. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक गुंतले होते. दरम्यान, आरोपी दिल्ली विमानतळावर येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. दिल्ली विमानतळावर पोहोचताच त्याला सोनिपत पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी आयपीसी कलम १२४ अ आणि  153 ब अन्वये अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी त्याला रिमांडवर घेतले आहे. पाकिस्तानमधील संघटनेशी त्याच्या संपर्कांची माहिती संकलित केली जाईल. पोलिसांनी आरोपीला सात दिवसांचा रिमांड सुनावला आहे. 

 

पाकिस्तानी महिलेशी लग्न केले
अटक आरोपीने फेसबुकवरील मैत्रीनंतर एका पाकिस्तानी महिलेशी लग्न केले, त्यामुळे शंका आणखी वाढली. आरोपीने बारावीपर्यंत शिक्षण घेतले असून त्याला संगणकाचे चांगले ज्ञान असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, त्याने बंदी घातलेल्या संघटनेचा मेसेज पुढे पाठविला होता, त्यामुळे तो त्या संस्थेच्या समूहात सामील झाला. त्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत होते.

इतर आरोपींशी संपर्क झाल्याचा खुलासा, त्यांच्या शोधात पोलीस 
अटक केलेल्या आरोपी विकास वर्मा उर्फ ​​मोहम्मद विकास याच्याशी अन्य लोक संपर्कात आल्याचा खुलासा झाला आहे. यामुळे पोलीस पथक सतत त्यांच्या शोध घेण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. या प्रकरणातील अन्य लोकांवर लवकरच कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

 

सेक्टर -10 भागात राहणाऱ्या तरूणाचा पाकिस्तानमधील एका बंदी घातलेल्या संस्थेशी संपर्क असल्याचे वृत्त आहे. ज्यामध्ये आरोपीवर कारवाई केली आहे. त्याला रिमांडवर घेण्यात आले आहे. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर या प्रकरणावर शिक्कामोर्तब होईल. चौकशीत विदेशात त्याच्याशी संपर्क साधण्यामागील कारणे देखील निश्चित केली जातील. त्याच वेळी, तो इतर कोणकोणत्या व्यक्तींशी संपर्कात होता याचा शोध घेतला जाईल. - जश्नदीप सिंह रंधावा, एसपी सोनीपत

Web Title: A youth who came from Dubai via Pakistan was arrested from Delhi airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.