शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

भिवंडीत चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 11:55 PM

नारपोली पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्व आरोपींना नारपोली पोलिसांनी अटक केली आहे . 

भिवंडी- चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रविवारी समोर आली असून याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्व आरोपींना नारपोली पोलिसांनी अटक केली आहे . 

रमेश मुरली शर्मा ( वय २५ रा . चरीगावा उत्तर प्रदेश ) असे जमेच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो रविवारी रात्री नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मुनीसुरत कंपाउंड येथील भंगार दुकानात रात्री दिडच्या सुमारास आला असता याठिकाणी असलेल्या जमावाने त्यास चोर असल्याच्या संशयावरून बेदम मारहाण केली .

या मारहाणीत रमेश याचा मृत्यू झाला असून मयत रमेशचे वडील मुरली रामप्रसाद शर्मा ( वय ४५ रा . वागले इस्टेट ठाणे , मूळ रा. चरीगावा उत्तर प्रदेश) यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून याप्रकरणी शिवपूजन भगवानदास गुप्ता ( वय ३० ) पिंटू पंचगुलाम गुप्ता ( वय २२ ) , पंचगुलाम जोकूराम गुप्ता ( ४४ ) शिवकुमार मुरली वर्मा ( ३२ ) पवनकुमार रामसहाय मिश्रा ( २७ ) देवीप्रसाद टिळकराम वर्मा ( ३० ) बाबुलाल शिवप्रसाद गौतम ( २० ) जगदीश रामनरेश गौतम ( २१ ) रामभरोस रामकुशनु निशाद ( २८ ) अशा नऊ जणांना अटक केली असून त्यांना सोमवारी न्यायालयात हजार केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे . पुढील तपास नारपोली पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत करीत आहेत .    

टॅग्स :Deathमृत्यूBhiwandiभिवंडी