शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

मित्राच्या प्रेमप्रकरणाच्या वादात युवक गंभीर जखमी; विटा, तलवारीने केले वार

By दयानंद पाईकराव | Updated: February 12, 2024 16:23 IST

पाचपावली पोलिसांनी केली तीन आरोपींना अटक

नागपूर : मित्राच्या प्रेम प्रकरणाचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या युवकावर तीन आरोपींनी विटा आणि तलवारीने वार केल्यामुळे युवक गंभीर जखमी झाला. ही घटना पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान पोलिसांनी हल्लेखोर तीन्ही आरोपींना गजाआड केले आहे.

रोहीत सुनिल नाहरकर (१८), श्याम बाबु कुसेरे (३०) आणि राजकुमार बंडु लाचलवार (२०) सर्वजण रा. पंचकुआ हनुमान मंदिराजवळ, पाचपावली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अभिषेक उर्फ भांजा संजय गुलाबे (२३, रा. तांडापेठ, मोचीपूरा हनुमान मंदीरा जवळ, पाचपावली) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. अभिषेकचा मित्र आशिष याचे एका मुलीवर प्रेम होते. त्यामुळे मुलीचा नातेवाईक असलेला रोहितसोबत आशिषचा वाद सुरु होता. त्यामुळे आशिषने आपल्या प्रेमप्रकरणाचा वाद मिटविण्यासाठी आपला मित्र अभिषेकला रोहितकडे पाठविले.

अभिषेक आपले चार मित्र घेऊन रोहितकडे पंचकुआ हनुमान मंदिराजवळ गेला. तेथे अभिषेकसोबत रोहित आणि त्याच्या दोन साथीदारांनी वाद घातला. त्यानंतर आरोपींनी संगणमत करून हातात विटा व तलवार घेऊन अभिषेकला जीवे मारण्याच्या हेतुने त्याच्या डोक्यावर, मानेवर, हातावर व छातीवर वार करून त्यास गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेतील अभिषेकला मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अभिषेकची आई रत्नमाला संजय गुलाबे (४१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावलीचे सहायक पोलिस निरीक्षक प्रविण सोमवंशी यांनी आरोपींविरुद्ध कलम ३०७, ३४, सहकलम ४ /२५, १३५ नुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसnagpurनागपूर