शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्ब बनवला अन् निकामी करायला पोलिसात गेला; कुरापतखोर युवकाचा प्रताप बघून प्रशासन हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 07:20 IST

Bomb making on you tube video: एका  थैलीत हा जिवंत बॉम्ब ठेवला व तो सरळ नंदनवन पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने तेथील पोलीस हवालदार मडावी यांना आपल्याजवळ बॉम्ब असल्याची माहिती दिली. 

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एका रिकाम्या कुरापतखोर युवकाने यू-ट्यूबचे व्हिडीओ बघून चक्क बॉम्ब तयार केला. पण तो निकामी कसा करायचा याची माहिती नसल्याने त्याची तंतरली. मग त्याने तो जिवंत बॉम्ब पिशवीत टाकून पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण केले. बऱ्याच परिश्रमानंतर बॉम्ब निकामी करण्यात आला. त्यामुळे स्फोटाची घटना टळून अनेकांचे जीव वाचले. (Youth made bomb at home, but after he went to police.)

नंदनवन पोलीस ठाण्यात शनिवारी हे थरारनाट्य घडले. राहुल युवराज पगाडे (२५) असे या ‘काडीबाज’ आरोपीचे नाव आहे. नंदनवन ठाण्याच्या हद्दीतील साईबाबानगरात तो राहतो. यू-ट्यूबवर बॉम्ब कसा बनवायचा, याचे त्याने व्हिडीओ बघितले आणि त्याच्या डोक्यात बॉम्ब बनविण्याचा किडा वळवळू लागला. त्यानुसार त्याने बॅटरी, इलेक्ट्रिक सर्किट, तसेच इतर साहित्य जमविले आणि बॉम्ब तयार केला. बॉम्ब तयार तर झाला, आता तो निकामी कसा करायचा, असा प्रश्न त्याला पडला. ते तंत्र त्याला अवगत नव्हते. बॉम्बचा स्फोट होऊ शकतो आणि आपला जीव जाऊ शकतो, याची त्याला कल्पना आल्याने तो नखशिखांत हादरला. काय करावे हे त्याला कळेना. 

अखेर त्याने एका  थैलीत हा जिवंत बॉम्ब ठेवला व तो सरळ नंदनवन पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने तेथील पोलीस हवालदार मडावी यांना आपल्याजवळ बॉम्ब असल्याची माहिती दिली. 

मनोरुग्ण असावा, असे समजून पोलिसांनी आधी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्याने शांतपणे पिशवीतून बॉम्ब काढला आणि पोलिसांपुढे ठेवला. जिवंत बॉम्ब पुढ्यात बघून ठाण्यात एकच खळबळ उडाली. ठाणेदार  मुक्तार शेख यांनी लगेच वरिष्ठांना, तसेच बॉम्बशोधक आणि नाशक पथकाला माहिती देऊन ठाण्यात बोलावून घेतले. दोन मिनिटांतच संपूर्ण पोलीस ठाणे रिकामे झाले. बॉम्बनाशक पथक ठाण्यात पोहोचले. त्यांनी बॉम्ब बघितला. तो ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी नेला. बॉम्बचे इलेक्ट्रिक सर्किट बॅटरीपासून वेगळे केले व बॉम्ब निकामी केला.

यंत्रणेचा जीव भांड्यात नंदनवन ठाण्यात एक माथेफिरू जिवंत बॉम्ब घेऊन पोहोचल्याचे कळताच शहर पोलीस यंत्रणा हादरली. अनेक वरिष्ठांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. बॉम्ब निकामी झाल्याचे कळताच पोलीस यंत्रणेचा जीव भांड्यात पडला.  

पोलिसांची गोपनीयताविशेष म्हणजे या खळबळजनक घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून शनिवारी आणि रविवारी सकाळपर्यंत पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली होती, हे विशेष! आरोपी गजाआडआरोपी राहुल पगाडेविरुद्ध भारतीय हत्यार कायदा सहकलम १२३, तसेच भादंविच्या अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

टॅग्स :Bombsस्फोटकेnagpurनागपूरPoliceपोलिस