शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक रोड येथील गोरेवाडी भागात युवकाचा धारदार शस्त्राने खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 05:29 IST

नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत गोरेवाडी भागात एका युवकाचा कुरापत काढून धारदार शस्त्राने सपासप वार करून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि. २) रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली.

नाशिक : शहर व परिसरात खुनाचे सत्र सुरूच असून नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत गोरेवाडी भागात एका युवकाचा कुरापत काढून धारदार शस्त्राने सपासप वार करून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि. २) रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली. कृष्णा दीपक ठाकरे (वय २४) असे मृताचे नाव आहे. 

नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोरेवाडी भागात कृष्णा याच्यावर तिघा हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवीला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला जखमी अवस्थेत जवळच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळाने त्यास शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून कृष्णा यास मयत घोषित केले. याप्रकरणी मध्यरात्री उशिरापर्यंत नाशिकरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.  मारेकरी फरार झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे. मागील नऊ महिन्यांत  शहरात ४२ खून झाले आहेत. ऑक्टोबर महिन्याची सुरुवातदेखील खुनाच्या घटनेने झाली. दुसऱ्याचदिवशी पून्हा एका युवकाचा खून झाल्याने आता खुनाच्या घटनांचा आकडा ४३वर पोहचला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik Road: Youth brutally murdered in Gorewadi area

Web Summary : A 24-year-old youth, Krishna Thakare, was murdered in Nashik Road's Gorewadi. Three assailants attacked him with sharp weapons. He succumbed to his injuries in the hospital. Police are investigating; the killers are absconding. The city has witnessed 43 murders in nine months.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक