शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमधील बिलाचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 12:41 IST

आरोपींनी हितेशला पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर आणले, तिथे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले.

पिंपरी : हॉटेलमधील बिलाच्या वादावरून झालेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाचे अपहरण केले. त्यानंतर तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून गळा चिरून खून केला. ही घटना सोमवारी पहाटे पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूच्या रस्त्यावर घडली.  हितेश मुलचंदानी (वय २३, रा. डी.ब्लॉक, पिंपरी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी चार इसमांवर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेशच्या मित्राचे कासारवाडी येथील हॉटेलमध्ये बिलावरून वाद झाले. किरकोळ वादाचे रुपांतर भांडणात झाले. हॉटेलमध्ये भांडण सुरू असल्याबाबत हितेश याला त्याचा मित्राचा फोन आला. हितेशने त्याच्या काही मित्रांसोबत हॉटेलमध्ये धाव घेतली. हॉटेलमध्ये सुरू असलेली भांडणे सोडवत असताना चार इसमांनी हितेशला जबरदस्तीने गाडीत बसवले.  चौघांनी हितेशला पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर आणले, तिथे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तसेच त्याचा गळा चिरला. यामध्ये गंभीर जखमी होऊन हितेशचा मृत्यू झाला. पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडFiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhotelहॉटेल