शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; मृतदेहावर दोन कुटुंबांचा दावा, पोलीसही झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 20:02 IST

हा तरुण आमच्या कुटुंबातील असल्याचं सांगत आणखी काही लोकं पोलिसांकडे पोहोचली.

रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विचित्र प्रकार घडला आहे. पोलिसांनी सदर तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवागारात ठेवला. तीन दिवस उलटून गेल्यानंतरही कोणीही हा मृतदेह ताब्यात घेण्यास आलं नाही. मात्र चौथ्या दिवशी एक कुटुंब काही कागदपत्रे घेऊन आलं आणि त्यांनी सदर तरुण आपल्या कुटुंबातील असल्याचं सांगितलं. त्या कुटुंबाने मृतदेहावर अंत्यसंस्कारदेखील केले. परंतु आता आणखी एक कुटुंब शवागारात आलं असून त्या तरुणाचे आम्ही पालक असल्याचा दावा केला आहे. उत्तर प्रदेशातील इटावा येथील या सर्व प्रकाराने पोलीसही हैराण झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्रेंड्स कॉलनी परिसरातील महरा फाटक इथं एका अज्ञात तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबतची माहिती स्थानिकांकडून मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. सदर तरुणाची ओळख न पटल्याने पोलिसांनी मृतदेह शवागारात ठेवला. घटनेच्या तीन दिवसांनंतर एका कुटुंबाने तिथं येत मृतदेहावर दावा सांगितला आणि मृतदेह घेऊन जात त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

तरुणावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर नवा वाद निर्माण झाला. कारण हा तरुण आमच्या कुटुंबातील असल्याचं सांगत आणखी काही लोकं पोलिसांकडे पोहोचली. या लोकांकडील कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर मृत तरुणाचे नाव सत्यवीर राजपूत असं असल्याचं स्पष्ट झालं. या तरुणाचे वय ४० वर्ष इतकं असून तो मानसिकदृष्ट्या अस्थिर होता, अशीही माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.

दरम्यान, एकाच तरुणाबाबत दोन कुटुंबीयांनी दावे केल्याने पोलिसांसमोर संभ्रम निर्माण झाला. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात