नागपुरात मारहाणीमुळे व्यथित झालेल्या तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:22 IST2020-02-12T00:20:45+5:302020-02-12T00:22:25+5:30

चार चौघांसमोर मारहाण झाल्याने व्यथित तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली.

Youth committed suicide due to assault in Nagpur | नागपुरात मारहाणीमुळे व्यथित झालेल्या तरुणाची आत्महत्या

नागपुरात मारहाणीमुळे व्यथित झालेल्या तरुणाची आत्महत्या

ठळक मुद्दे१० दिवसानंतर कारण उघड : दोघांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चार चौघांसमोर मारहाण झाल्याने व्यथित तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. शुभम रामाजी रामटेके (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे.
१ फेब्रुवारीला शुभम रामटेकेने गळफास लावून आत्महत्या केली होती. वाठोडा पोलिसांनी त्यावेळी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांनी चौकशी केली असता शुभमच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले. रामटेके यांच्याकडे किरायाने राहणाऱ्या मोना मिश्रा नामक महिलेसोबत ३१ जानेवारीला दुपारी पाणी टाकण्यावरून वाद झाला होता. यावेळी मोनाच्या दोन साथीदारांनी शुभमला मारहाण केली होती. मोहल्ल्यातील लोकांसमोर झालेल्या या अपमानामुळे शुभम व्यथित झाला होता. या अवस्थेत त्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येला मोनाचे दोन साथीदार जबाबदार असल्याचे उघड झाल्याने रामाजी रामटेके यांची नव्याने तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी त्या दोघांविरुद्ध कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
विशेष म्हणजे, या प्रकरणात पोलिसांनी मोनाची चौकशी केली की नाही, ते स्पष्ट होऊ शकले नाही. मोनासोबत वाद झाल्यामुळेच तिच्या सोन साथीदारांनी शुभमला मारहाण केली. त्यामुळे मोनावर पोलीस कोणती कारवाई करतात, त्याकडे शुभमच्या नातेवाईकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Youth committed suicide due to assault in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.