सासरी दर महिन्याला २० हजार देतोय! रेल्वे रुळांवर उडी घेत तरुणानं स्वत:ला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 17:46 IST2021-10-05T17:45:59+5:302021-10-05T17:46:11+5:30

रेल्वे रुळांवर तरुणाची आत्महत्या; पोलिसांकडून गुन्हा दाखल

youth commits suicide by jumping in front of train man made video before suicide panipat | सासरी दर महिन्याला २० हजार देतोय! रेल्वे रुळांवर उडी घेत तरुणानं स्वत:ला संपवलं

सासरी दर महिन्याला २० हजार देतोय! रेल्वे रुळांवर उडी घेत तरुणानं स्वत:ला संपवलं

पानीपत: हरयाणातील पानीपतमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. दिवाना गावाजवळ एका तरुणानं रेल्वे रुळांवर उडी मारत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणानं एक व्हिडीओ चित्रीत केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात त्यानं पत्नी आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत.

मृत तरुणाचं नाव वेदपाल होतं. तो दिवानाचा रहिवासी होता. त्यानं आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ चित्रित करून सोशल मीडियावर पोस्ट केला. वेदपालनं त्याच्या आत्महत्येसाठी पत्नी, सासरे, मेहुणा, मेहुणी आणि सासरच्या कुटुंबातील इतरांना जबाबदार धरलं आहे. 

आत्महत्येपूर्वी व्हिडीओ चित्रित करत सांगितलं कारण
जीवनयात्रा संपवण्यापूर्वी तरुणानं एक व्हिडीओ चित्रित केला. 'मी माझ्या सासरच्या माणसांना गेल्या ८ वर्षांपासून दर महिन्याला २० हजार रुपये देतोय. मात्र त्यांच्या मागण्या वाढतच चालल्या आहेत. त्या मी पूर्ण करू शकत नाही. त्यामुळेच मी आत्महत्या करतोय,' असं तरुणानं म्हटलं. यानंतर त्यानं रेल्वे रुळांवर उडी घेत स्वत:ला संपवलं.

एका तरुणानं रेल्वे रुळांवर उडी घेऊन जीवन संपवल्याची माहिती जीआरपी ठाण्याचे प्रभारी राजकुमार यांनी दिली. आत्महत्या केलेला तरुण दिवानाचा रहिवासी असून या प्रकरणी कलम १७४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: youth commits suicide by jumping in front of train man made video before suicide panipat