अंबरनाथमध्ये तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या; आरोपी फरार, गुन्हा दाखल

By पंकज पाटील | Updated: June 24, 2024 15:38 IST2024-06-24T15:37:49+5:302024-06-24T15:38:10+5:30

हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे

Youth brutally stabbed to death in Ambernath; Accused absconding, case registered | अंबरनाथमध्ये तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या; आरोपी फरार, गुन्हा दाखल

अंबरनाथमध्ये तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या; आरोपी फरार, गुन्हा दाखल

अंबरनाथ - अंबरनाथच्या ऑर्डन्स फॅक्टरी येथील अंबर चौकात एका २५ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर आरोपी हे फरार झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पूर्व वैमन्यासातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सचिन भोसले असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो जावसाई गाव येथील राहणारा आहे. रात्रीच्या सुमारास सचिनची काही अज्ञात मारेकऱ्यांनी ऑर्डन्स फॅक्टरी जवळील अंबर चौकात  सचिनच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर वार करून हत्या केलीये.  हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हत्येतील मारेकऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत 

Web Title: Youth brutally stabbed to death in Ambernath; Accused absconding, case registered