शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

१०० गुंडांसोबत युवक थेट घरात घुसला अन् फिल्मी स्टाईलनं मुलीला पळवलं, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 11:02 IST

कार आणि ट्रकमधून आलेल्या टोळक्यांकडे शस्त्र होती. ते डेंटल हाऊस सर्जनच्या दुमजली घराजवळ पोहचले.

हैदराबाद - तेलंगणाच्या हैदराबाद इथं हैराण करणारी घटना समोर आली आहे. ही कहाणी पूर्ण फिल्मी आहे. युवकानं एका कार्यक्रमात युवतीला पाहिलं. एका नजरेत तिच्यावर प्रेम जडलं. युवतीच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिला. त्यानंतर युवकाने युवतीच्या घरासमोरच घर बांधले आणि युवतीवर नजर ठेवण्यास सुरूवात केली. आता यापुढे जे काही घडले त्याने सगळ्यांनाच धक्का बसला. 

युवतीच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं तेव्हा युवकाने फिल्मी स्टाईलनं साखरपुड्याच्या काही तास आधी थेट युवतीच्या घरात घुसून तिचं अपहरण केले. यावेळी त्याने १०० मुलांना सोबत आणले होते. घराच्या चहुबाजूने पोरांचा वेढा पडला होता. तोडफोड सुरू झाली. गोंधळ उडाला त्यात युवक युवतीला घेऊन पसार झाला. या घटनेच्या ८ तासांनी फजीहदच्या पोलिसांनी युवतीला ताब्यात घेतले परंतु युवक अद्यापही फरार आहे. 

कार आणि ट्रकमधून आलेल्या टोळक्यांकडे शस्त्र होती. ते डेंटल हाऊस सर्जनच्या दुमजली घराजवळ पोहचले. घराला चहुबाजूने घेरले. काही गुंड आत घुसले आणि ३० मिनिटे हे थरारनाट्य घडले. त्यांनी घरातील सदस्यांना बेदम मारहाण केली. यावेळी युवतीच्या वडिलांसह ५ जण गंभीर जखमी झाले. या घटनेवेळी आसपासच्या नागरिकांनी पोलिसांना फोन करून मदत मागितली परंतु पोलीस पोहचले नाहीत. युवकांनी ओळख लपवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. घरातील कॉम्प्युटर, डेटा सॉफ्टवेअर सर्व नष्ट केले. फर्निचर तोडले आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान केले. 

८ तासांनी युवती सापडली...युवतीचं फिल्मी स्टाईलनं केलेल्या अपहरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इतकी मोठी घटना घडल्यानंतर आता पोलीस दलात खळबळ माजली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गांभीर्य ओळखून तपासाला सुरुवात केली. युवतीचा शोध घेण्यासाठी पथके नेमली. जवळपास ८ तासांनी रात्री उशीरा शहराच्या बाहेरच्या परिसरात युवती पोलिसांना सापडली. 

कोण आहे आरोपी?यातील आरोपी युवक हा नवीन रेड्डी बेवरेज आऊटलेटचा मालक आहे. तो वैशालीवर प्रेम करायचा. जेव्हा त्याला कळलं वैशालीचं लग्न ठरलंय तेव्हा त्याने तिचं अपहरण करण्याचा डाव रचला. नवीन रेड्डीने वैशालीला वरच्या मजल्यावरून खाली खेचत आणलं. त्यानंतर एका कारमध्ये बसवलं आणि घेऊन गेला. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तपास करत ८ जणांना ताब्यात घेतले. मुलीची सुटका केली परंतु मुख्य आरोपी नवीन अद्यापही फरार आहे. 

वैशाली आणि नवीनची भेट कशी झाली?वैशालीच्या कुटुंबाने सांगितले की, काही महिन्यापूर्वी बॅडमिंटन स्पर्धेच्या कार्यक्रमात नवीन वैशालीला भेटला होता. त्याठिकाणी नवीननं आम्हाला वैशालीसोबत लग्न करण्याची मागणी घातली. तेव्हा आम्ही मुलीला विचारलं तर तिने या प्रस्तावाला नकार दिला. त्यानंतर नवीनने राजकीय दबाव आणला परंतु आम्ही जास्त रस घेतला नाही. त्यामुळे नाराज होऊन नवीननं आमच्या घरासमोरच घर बनवलं. वैशालीचा पाठलाग सुरू केला. तिच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली. याबाबत आम्ही पोलीस तक्रार केली परंतु त्याची दखल घेतली नाही.  

टॅग्स :Kidnappingअपहरण