शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

वणीत अपहरण करून युवतीवर अत्याचार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 3:14 PM

याप्रकरणी वणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

वणी (यवतमाळ) : येथील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करणा-या युवतीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. 

याप्रकरणी वणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. पिडित युवती मंगळवारी रात्री ड्युटी आटोपून पायदळ घराकडे परत जात असताना वणीतील महाराष्ट्र बँक चौकात मागाहून आलेल्या पांढ-या रंगाच्या टाटा इंडिका कारच्या चालकाने तिला सुगम हॉस्पीटल कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावर पिडितेने त्याला सुगमकडे जाण्याचा मार्ग सांगितला. मात्र तुम्ही पायदळ त्याच मार्गाने जात असाल तर गाडीत बसा. मला हॉस्पिटल दाखवा, असे सांगून कार चालकाने पिडितेला गाडीत बसविले. पिडिता वाहनात मागील सीटवर बसताच, चालकाने कारचे काच बंद करून साईमंदिर चौकातून, नांदेपेरा मार्गाने कार वळविली.

यवतमाळ बायबासवर पोहचल्यानंतर यवतमाळ मार्गाने पुढे १० किलोमिटर पुढे जाऊन एका निर्जनस्थळी कार थांबविली. पिडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन कारमध्येच तिच्यावर अत्याचार केला. यावेळी त्याने तिचा मोबाईलदेखील हिसकावून घेतला. त्यानंतर पुन्हा त्याने कार वणीकडे वळविली. नांदेपेरा मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर आणून तिला सोडून दिले व तो कार घेऊन पळून गेला. 

याप्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ३६६, ३७६ (१), ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून त्याचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ