'तो' गुपचूप मैत्रिणीला भेटायला गेला पण गावकऱ्यांनी पकडलं, बेदम मारलं, खांबाला बांधलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 17:12 IST2023-01-03T14:18:47+5:302023-01-03T17:12:53+5:30
आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आला होता. यावेळी लोकांनी त्याला पकडून खूप मारहाण केली.

'तो' गुपचूप मैत्रिणीला भेटायला गेला पण गावकऱ्यांनी पकडलं, बेदम मारलं, खांबाला बांधलं अन्...
उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीला विजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. हा व्यक्ती आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आला होता. यावेळी लोकांनी त्याला पकडून खूप मारहाण केली. मात्र महिलेने या व्यक्तीने तिचा विनयभंग आणि जबरदस्तीने घरात घुसल्याचा आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बलरामपूर येथे एका तरुणावर महिलेच्या घरात घुसून विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी तरुणाला विजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून पोलिसांनी काही लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. तरुणाला मारहाण करणाऱ्या मुख्य आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे.
हे प्रकरण पचपेडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडगौ गावातील आहे. गावात राहणाऱ्या सोनू गुप्ता या तरुणाने सोमवारी रात्री गावात राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग सुरू केला. महिलेचा पती नोकरीनिमित्त बाहेर राहतो. महिलेने आरडोओरडा केला तेव्हा गावकऱ्यांनी सोनू गुप्ता या तरुणाला पकडून विजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण केली. खांबाला बांधून सोनू गुप्ता यांना काठ्यांनी मारहाण करण्यात आली.
जिल्ह्याच्या एसपींनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण जेव्हा आपल्या मैत्रिणीला भेटायला गेला होता तेव्हा गावकऱ्यांनी त्याला मारहाण केली, परंतु पीडित महिलेने सांगितले की, सोनू गुप्ता हा तरुण रात्री तिच्या घरात घुसून तिचा विनयभंग करत होता. पोलिसांनी एका मुख्य आरोपीला अटक करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"