शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस हादरले! तरुणाने दोन मुलींवर फेकले ॲसिड; एकीची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 20:26 IST

Acid Attack : दोन्ही बहिणींना पिलाना सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. मोठ्या बहिणीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्याचवेळी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

बागपत - उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे दोन मुस्लिम बहिणींवर ॲसिड टाकल्याची घटना घडली आहे. दोन्ही बहिणींना पिलाना सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. मोठ्या बहिणीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्याचवेळी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलैनी पोलिस स्टेशन हद्दीतील रोशनगड गावात मंगळवारी सकाळी गावातील एका तरुणाने दोन मुस्लिम बहिणींवर ॲसिड फेकले. आरोपी तरुण अनेक दिवसांपासून मुलींची छेड काढत होता, असे सांगण्यात येत आहे. मंगळवारी घराबाहेर पडलेल्या बहिणींवर ॲसिड टाकून तरुण फरार झाला. दोन्ही बहिणींवर ॲसिड टाकल्यानंतर मोठ्या बहिणीची प्रकृती चिंताजनक आहे. उपचारासाठी पिलाना सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. दोन्ही बहिणींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आरोपी तरुण फरारडॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर मोठ्या बहिणीला जिल्हा रुग्णालयात नेण्यास रेफर करण्यात आले आहे. त्याचवेळी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली.बागपतचे एसपी नीरज कुमार जदौन यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील रोशनगड गावात दोन मुलींवर ॲसिड फेकल्याची घटना समोर आली आहे. मुलींच्या वडिलांनी गावातील एका मुलावर आरोप केले आहेत. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.या घटनेने पोलीस हादरलेउत्तर प्रदेशातील बागपतमध्ये ॲसिड हल्ल्याच्या घटनेमुळे पोलिसांची तारांबळ उडाली आहे. एसपी बागपत यांच्या सूचनेनंतर एक टीम तयार करण्यात आली असून आरोपी तरुणाचा शोध सुरू आहे. तर मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा अधिकारी राजकमल यादव यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश कुमार यांना उपचारात कोणताही हलगर्जीपणा न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.गावागावात अ‍ॅसिडची विक्री होत आहेॲसिड मिळवणे कठीण नाही. खेड्यातील गल्ल्यांमध्ये ॲसिड सहज सापडते. भाज्यांप्रमाणेच काही लोक त्याचा व्यवसाय सायकली आणि गाड्यांवर करतात. २० रुपये लिटर दराने गावागावात पुरवठा केला जातो. विक्रेत्या तरुणाने सांगितले की, या ॲसिडचा वापर टॉयलेट साफ करण्यासाठी केला जातो. कमी किमतीमुळे गावकरी सहज खरेदी करतात.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेश