नागपूरमध्ये अज्ञात मारेकर्यांकडून तरुणाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 00:04 IST2021-05-24T00:03:47+5:302021-05-24T00:04:25+5:30
Murder in Nagpur: कोतवाली पोलीस तसेच पोलीस उपायुक्त लोहित मतानी घटनास्थळी पोहोचले होते

नागपूरमध्ये अज्ञात मारेकर्यांकडून तरुणाचा खून
नागपूर : कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री अज्ञात मारेकर्यांनी एका तरुणाची हत्या केली. (Murder in Nagpur at midnight. )
वृत्त हाती आले तेव्हा कोतवाली पोलीस तसेच पोलीस उपायुक्त लोहित मतानी घटनास्थळी पोहोचले होते. रात्री ११.५० पर्यंत मृत अथवा मारेकऱ्याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. चौकशी सुरू असल्याचे घटनास्थळाहुन पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी लोकमतला सांगितले.