शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

गैरवर्तन : पीडित बालिकेची साक्ष गाह्य धरुन तरुणाला पाच वर्ष कारावास  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 21:20 IST

पीडित व तपाधिकारी वगळता सर्वच साक्षीदार फितूर झाले, मात्र पीडित बालिकेचीच साक्ष ग्राह्य धरुन आरोपीस सुनावली शिक्षा

जळगाव : बारा वर्षीय बालिकेचा तिच्या घरात जावून विनयभंग केल्याच्या प्रकरणात केवळ पीडित बालिकेचीच साक्ष ग्राह्य धरुन आरिफ युसुफ खाटीक (२५, रा.साकरे, ता.धरणगाव) या आरोपीला न्यायालयाने पाच वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी मंगळवारी हा निकाल दिला.पीडित बालिका १४ सप्टेबर २०१६ रोजी सकाळी १०.३० वाजता शाळेत जाण्यासाठी घराचा दरवाजा बंद करीत असताना आरिफ खाटीक हा पीडितेजवळ गेला व बाजारासाठी पिशवी मागितली. दरवाजा उघडून बालिका घरात गेली असता आरिफ तिच्यामागे गेला व तिच्याशी अश्लिल वर्तन केले. पीडितेने आरडाओरड केल्यानंतर आरिफने तेथून पळ काढला. याप्रकरणी धरणगाव पोलिसात कलम ३५४, ४५२ व पोक्सो कायदा कलम ७, ८ व ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.तपासाधिकारी वगळता सर्व साक्षीदार फितूरया खटल्याचे वैशिष्टे असे की, पीडित व तपाधिकारी वगळता सर्वच साक्षीदार फितूर झाले होते. सरकारतर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. पीडिता ही आत्याकडे आलेली होती. त्यात आत्या, आई, पंच व इतर सर्व साक्षीदार फितूर झाले. सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी घटना सत्य असतानाही साक्षीदार फितूर झाले व भविष्यात असेच होत राहिले तर गुन्हा करणाऱ्याची हिंमत आणखी बळावेल. महिला व बालिकांचे संरक्षण व्हावे व कायद्याचा धाक तयार व्हावा यासाठी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी असा जोरदार युक्तिवाद अ‍ॅड.बोरसे यांनी केला. न्यायालयाने सरकारी वकीलांचा युक्तीवाद व पीडितेची साक्ष ग्राह्य धरुन आरोपीला पाच वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी शालीग्राम पाटील व तुषार मिस्तरी तसेच केसवॉच पंकज पाटील यांची या खटल्यात मदत झाली.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव