शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुलावर दुचाकी थांबवली, मोबाईल काढून ठेवला अन्..; मांजरा नदीपात्रामध्ये उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

By राजकुमार जोंधळे | Updated: June 18, 2025 21:57 IST

एका २८ वर्षीय तरुणाने लातूर-नांदेड महामार्गावरील भातखेडा पुलावरून मांजरा नदीपात्रामध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

उदगीर शहरात आडत दुकानावर मुनीम म्हणून काम करणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाने लातूर-नांदेड महामार्गावरील भातखेडा पुलावरून मांजरा नदीपात्रामध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास घडली. मयत तरुणाचा मृतदेह शाेधण्याला सायंकाळच्या सुमारास यश आले. कपील उद्धव शिंगडे (रा. पेठेवाडी ता. देवणी) असे मयत तरुणाचे नाव आहे.

पाेलिसांनी सांगितले, कपिल उद्धव शिंगडे हा उदगीर शहरातील एका आडत दुकानावर मुनीम म्हणून काम करत हाेता. दरम्यान, बुधवारी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास लातूर-नांदेड महामार्गावरील भातखेडा येथील पुलावर त्याने आपली दुचाकी थांबवली. त्यानंतर खिशातील माेबाइल काढून ठेवला. विषाचा डबाही दुचाकीनजीक ठेवला आणि मांजरा नदीपात्रामध्ये उडी मारली. ही घटना रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या काही वाहनधारकांनी पाहिली. पुलावरून तरुणाने उडी मारल्याची माहिती भातखेडा ग्रामस्थांना दिली.

याबाबत पाेलिस पाटलांनी लातूर ग्रामीण ठाण्याचे पाेलिस निरीक्षक अरविंद पवार यांना तातडीने कळविले. घटनास्थळी पाेलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत मृतदेहाचा शाेध सुरू केला. वाहत्या पाण्यामध्ये मृतदेह वाहून गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानुसार ग्रामस्थांच्या मदतीने पाेलिसांनी शाेध माेहीम सुरू केली. सायंकाळपर्यंत शाेध घेतल्यानंतर मयत तरुणाचा मृतदेह दगडी पुलानजीक नदीपात्रामध्ये आढळून आला. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. एम. इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आकस्मित मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. तपास बीट अंमलदार पोहेकाॅ. पाटील हे करीत आहेत.

घटनास्थळी आढळली दुचाकी, माेबाइल आणि विषाचा डबा...घटनास्थळी मयताची दुचाकी, माेबाइल आणि विषाचा डबा आढळून आला आहे. तरुणाने विष प्राशन केले हाेते का? हे मात्र रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. उत्तरीय तपासणीमध्ये तरुणाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला असल्याचे शासकीय रुग्णालयातील डाॅक्टरांनी सांगितले, असे पाेलिस निरीक्षक अरविंद पवार म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू