वासरावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 15:32 IST2020-01-21T15:31:49+5:302020-01-21T15:32:32+5:30
युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे

वासरावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल
नांदेड : भोकर तालुक्यातील शेंबोली शिवारात एका वासरावर अनैसर्गिक संभोग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा सर्वस्तरावर निषेध केला जात आहे़
शेंबोली येथील नरेन देशमुख यांच्या आखाड्यावरील तीन महिन्याच्या वासरावर शेंबोली येथीलच नबीसाब शेख (वय २४) याने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ शेंबोली शिवारात शेत आखाड्यावर नबीसाब शेख हा अनैसर्गिक अत्याचार करताना सापडला़ त्याच्याविरुद्ध पापन्ना गोरेवाड यांनी तक्रार दिली आहे़ या तक्रारीवरुन बारड पोलिस ठाण्यात कलम ३७७ भादविसह कलम ११ प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक एच़सी़मोरखंडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे़ या घटनेनंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करीत नबीसाब शेखवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे़