चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 08:38 PM2021-10-11T20:38:21+5:302021-10-11T20:41:00+5:30

Death Case : सोमवारी न्यायालयात हजार केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Young man beaten to death by mob on suspicion of theft | चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू 

चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू 

Next
ठळक मुद्देरमेश मुरली शर्मा ( वय २५ रा . चरीगावा उत्तर प्रदेश ) असे जमेच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

भिवंडी - चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रविवारी समोर आली असून याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्व आरोपींना नारपोली पोलिसांनीअटक केली आहे. 

         

रमेश मुरली शर्मा ( वय २५ रा . चरीगावा उत्तर प्रदेश ) असे जमेच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो रविवारी रात्री नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मुनीसुरत कंपाउंड येथील भंगार दुकानात रात्री दिडच्या सुमारास आला असता याठिकाणी असलेल्या जमावाने त्यास चोर असल्याच्या संशयावरून बेदम मारहाण केली. या मारहाणीत रमेश याचा मृत्यू झाला असून मयत रमेशचे वडील मुरली रामप्रसाद शर्मा ( वय ४५ रा . वागले इस्टेट ठाणे , मूळ रा. चरीगावा उत्तर प्रदेश) यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून याप्रकरणी शिवपूजन भगवानदास गुप्ता ( वय ३० ) पिंटू पंचगुलाम गुप्ता ( वय २२ ) , पंचगुलाम जोकूराम गुप्ता ( ४४ ) शिवकुमार मुरली वर्मा ( ३२ ) पवनकुमार रामसहाय मिश्रा ( २७ ) देवीप्रसाद टिळकराम वर्मा ( ३० ) बाबुलाल शिवप्रसाद गौतम ( २० ) जगदीश रामनरेश गौतम ( २१ ) रामभरोस रामकुशनु निशाद ( २८ ) अशा नऊ जणांना अटक केली असून त्यांना सोमवारी न्यायालयात हजार केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास नारपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत करीत आहेत.

Web Title: Young man beaten to death by mob on suspicion of theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.