शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 11:17 IST

गंभीर जखमी झालेल्या तरुणाला जबलपूर स्टेशनवर ट्रेनमधून खाली उतरवून व्हिक्टोरिया रुग्णालयात नेण्यात आले. परंतु..

झारखंडहून गुजरातमधील सुरतला जाणाऱ्या ०९०४० धनबाद उधना एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. बोर्डिंग आणि सीटवरून झालेल्या वादानंतर आरोपीने तरुणावर ५४ वेळा चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे ट्रेनमध्ये मोठा गोंधळ उडाला आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली. गुन्हा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

या घटनेनंतर, गंभीर जखमी झालेल्या तरुणाला जबलपूर स्टेशनवर ट्रेनमधून खाली उतरवून व्हिक्टोरिया रुग्णालयात नेण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत तरुणाचे नाव ३४ वर्षीय शैलेंद्र झरिया असे असून, तो नर्मदापुरमचा रहिवासी होता. शैलेंद्र सतनाहून नर्मदापुरमला घरी परतत होता. ट्रेनमध्ये आरोपीशी वाद इतका वाढला की, त्याने शैलेंद्रवर क्रूरपणे हल्ला केला.

आरोपी फरारगुन्हा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच, जीआरपी स्टेशन हाऊस ऑफिसर संजीवनी राजपूत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक भावना मरावी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी सांगितले की, ते सीसीटीव्ही फुटेज आणि प्रवाशांच्या जबाबाच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रवाशांचा दावा आहे की ट्रेनमध्ये एकही सुरक्षा रक्षक उपस्थित नव्हता आणि कोणीही आरोपींना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.

जीआरपी स्टेशन हाऊस ऑफिसर संजीवनी राजपूत यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आरोपीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच त्याला अटक केली जाईल. रेल्वे प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून सुरक्षा वाढवण्याचे आणि गस्त सुधारण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि लोकांनी ट्रेनमध्ये सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याची मागणी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Man Attacked on Train: Stabbed 54 Times Over Seat Dispute

Web Summary : A man was fatally stabbed 54 times on a train following a dispute over boarding and seating. The victim, Shailendra Jharia, died in hospital. The assailant fled, prompting a police investigation and raising concerns about railway security.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातUttar Pradeshउत्तर प्रदेश