शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकण्यासाठी गोळ्या घेतल्या, रिअ‍ॅक्शनने तरुणीच्या जिवावर बेतल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 21:26 IST

ठाण्याच्या खोपट येथील घटना

ठळक मुद्देत्रास जाणवू लागल्यानंतर तिला त्याचदिवशी खोपट येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. साधारण १५ तासांच्या आत तिचा मृत्यू झाला. आता या गोळया कोणत्या होत्या? तिला त्या कोणी दिल्या या सर्व बाबीही तपासण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठाणे : शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळविण्याच्या तीव्र ईर्षेपोटी आयुर्वेदीक गोळया घेतल्यानंतर ठाण्यातील मेघना देवगडकर (22, रा. खोपट, ठाणे) या तरुणीचा मृत्यू  झाल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

खोपट भागात राहणारी नृत्यांगना असलेली मेघना ही कल्याण येथील एका जीममध्ये व्यायामासाठी नियमित जात होती. शरीरसौष्ठव स्पर्धेत तिला अव्वल राहण्यासाठी वजन कमी करायचे होते. यासाठी तिने ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास वजन कमी करण्यासाठी असलेल्या काही गोळया घेतल्या होत्या. त्रास जाणवू लागल्यानंतर तिला त्याचदिवशी खोपट येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

स्टिरॉइड घेणं पडलं जीवघेणं; शरीरसौष्ठव स्पर्धेदिवशीच झाला मृत्यू

प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना तिचा ४ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाला. ज्या गोळया तिने घेतल्या त्यावर बंदी होती किंवा कसे? याबाबतचा तपास करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी सांगितले. जीममध्ये वर्कआऊटला निघण्याआधी तिने या गोळया घेतल्या का? अशा सर्व बाबी पडताळण्यात येत आहेत.  गोळया घेतल्यानंतर तिला उलटयांचा त्रास सुरु  झाला. त्यानंतर साधारण १५ तासांच्या आत तिचा मृत्यू झाला. आता या गोळया कोणत्या होत्या? तिला त्या कोणी दिल्या या सर्व बाबीही तपासण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेbodybuildingशरीरसौष्ठवPoliceपोलिसDeathमृत्यू