'तूझं माझ्यावर लक्षच नाही' असं म्हणत महिलेचा विनयभंग!
By रूपेश हेळवे | Updated: July 15, 2023 15:23 IST2023-07-15T15:23:27+5:302023-07-15T15:23:52+5:30
याप्रकरणी महादेव रुद्रप्पा लोंढे ( रा. बेलाटी) याच्यावर सलगरवस्ती पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

'तूझं माझ्यावर लक्षच नाही' असं म्हणत महिलेचा विनयभंग!
सोलापूर : शेतात कामाला जात असलेल्या महिलेचा हात पकडून तिला मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी इसमावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी महादेव रुद्रप्पा लोंढे ( रा. बेलाटी) याच्यावर सलगरवस्ती पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित ही शेताला कामाला जात असते. १३ जुलै रोजी पीडिता नेहमी प्रमाणे कामाला जात असताना आरोपी लोंढे हा पीडितेच्या पाठलाग करत तिचा हात पकडून किती दिवस झाले मी तुझ्या मागे आहे, तूझं माझ्यावर लक्षच नाही असे म्हणत हात ओढत होता. तेव्हा पीडितेने आपला हात सोडवून तेथून पळ काढला.
त्यानंतर सायंकाळी पतीला घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर याबाबत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी महादेव लोंढे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.