शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

यूपीत गदारोळानंतर योगी सरकार ॲक्शन मोडमध्ये, 'हायलेव्हल' बैठक अन् 116 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 21:42 IST

Yogi Government in Action Mode : अशा परिस्थितीत योगी सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. राज्यात आतापर्यंत 116 जणांना अटक करण्यात आली आहे.

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त टिपण्णी करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे भाजपमधून निलंबित करण्यात आले. मात्र, त्यांच्या  वादग्रस्त वक्तव्यावरून शुक्रवारी नमाजानंतर देशातील अनेक शहरांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौपासून अनेक शहरांमध्येही हिंसाचार पाहायला मिळाला. अशा परिस्थितीत योगी सरकार क्शन मोडमध्ये आले आहे. राज्यात आतापर्यंत 116 जणांना अटक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत: वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीत सद्य परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत अशा समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सरकारने अधिकाऱ्यांना दिल्याचे बोलले जात आहे. कायदा हातात घेणाऱ्यांना कठोर धडा शिकवला जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे. दरम्यान, कारवाई करत प्रशासनाने सहारनपूरमध्ये 38, हाथरसमध्ये 24, आंबेडकर नगरमध्ये 23, प्रयागराजमध्ये 22, मुरादाबादमध्ये 7 आणि फिरोजाबादमध्ये 2 जणांना अटक केली आहे. 

प्रयागराजमध्ये हिंसाचार करणाऱ्यांविरोधात पोलिसांची कडक कारवाईसहारनपूरचे एसएसपी म्हणाले की, गोंधळ प्रकरणी पोलिसांनी 38 जणांना अटक केली आहे. याशिवाय हाथरसमध्ये 24 जणांना अटक करण्यात आली आहे. हाथरसमध्ये झालेल्या गदारोळानंतर रस्त्यांवर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. डीआयजी दीपक कुमार म्हणाले की, हे एक छोटे शहर आहे, दगडफेक झाली आहे, कडक कारवाई केली जात आहे, शांतता राखली जात आहे.मात्र, आठवडाभर याच विधानावरून प्रचंड दंगल झालेल्या कानपूरमध्ये सर्वसाधारणपणे शांतता होती. कडक पोलीस बंदोबस्तामुळे कानपूरमध्ये कोणताही गोंधळ झाला नाही. पण इतर शहरांमध्ये पोलिसांना अशी भीती नव्हती, तरीही नमाज्यांनी घोषणाबाजी केली आणि गोंधळ झाला. यानंतर उत्तर प्रदेश सरकार कारवाईच्या मोडमध्ये आले आहे.

 

राज्यातील विविध शहरांमध्ये दगडफेकीच्या घटनांनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आंदोलकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ACS गृह अवनीश अवस्थी, कार्यवाहक DGP, ADG कायदा आणि सुव्यवस्था सारखे अधिकारी पोलिस मुख्यालयातून परिस्थितीवर करडी लक्ष ठेवून आहेत. सर्व जिल्ह्यांतून अहवाल मागवले जात आहेत.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटकstone peltingदगडफेक