शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

खळबळजनक! योगप्रशिक्षिकेने मित्राचे गुप्तांग कापले; कारण तर काहीच नव्हते

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 21:26 IST

Yoga instructor chops off private parts of male friend : पीडित योगशिक्षकाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी झाल्या प्रकाराचा तपास सुरू केला आहे. जयपूरमधील भांकरोटा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जयपूरमध्ये एक अतिशय धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. ३५ वर्षीय योगशिक्षिकेने २८ वर्षीय मित्राचं गुप्तांग कापल्याचे घटना घडली आहे. २८ वर्षीय मित्र देखील योगशिक्षक आहे. 

पीडित योगशिक्षकाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी झाल्या प्रकाराचा तपास सुरू केला आहे. जयपूरमधील भांकरोटा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित पुरुष योगशिक्षकाने तो बिकानेरचा आहे असल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच गेल्या तीन वर्षांपासून जयपूरमध्ये राहून शिक्षण घेत आहे आणि योगशिक्षक म्हणून देखील कार्यरत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची एका महिलेशी ओळख झाली. त्यानंतर ते दोघांत मैत्री वाढली आणि नंतर ते एकमेकांच्या घरीही येऊ-जाऊ लागले. ती सुद्धा महिला योगशिक्षक म्हणूनच काम करत आहे.

१६ नोव्हेंबर रोजी पीडित योग क्लास संपल्यानंतर वैशाली नगरमधून कनक वृंदावन येथील आपल्या घरी जात होता. तेव्हा त्या योगशिक्षिकेने त्याला तिच्यासाठी दूध आणि भाजीपाला आणायला सांगितलं. तेव्हा तो ते सामान घेऊन त्या महिलेच्या गांधी पथावरच्या फ्लॅटमध्ये गेला. नंतर त्या महिलेने त्याच्यासाठी जेवण तयार केलं आणि तिथेच त्याने जेवण केले.

जेवून झाल्यानंतर जेव्हा तो तरुण आपल्या घरी निघाला, तेव्हा ती महिला देखील त्याच्यासोबत त्याच्या घरी आली. घरी पोहोचताच मुलाला चक्कर येऊ लागली. म्हणून तो बेडवर झोपला. त्यावेळी ती महिलाही त्याच्या घरीच होती. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्याला जाग आली. त्यावेळी गुप्तांगाजवळ वेदना होत असल्याची जाणीव झाली. कपडे फाटून बेडवर आणि फरशीवरही रक्त सांडलं असल्याचंही त्याला दिसलं. जखमी अवस्थेत तरुण उठला, तेव्हा ती महिला त्याच्या फ्लॅटवर नव्हती. त्याने मदतीसाठी आवाज दिला. मात्र, मध्यरात्र असल्याने त्याला शेजाऱ्यांकडून काही मदत मिळू शकली नाही. तेव्हा त्याने त्या महिलेला फोन लावला. त्यावर त्या महिलेने मला माफ कर म्हणत माफी मागितली. त्यानंतर तिने त्याला SMS हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. SMS हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसYogaयोगासने प्रकार व फायदे