शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
2
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
3
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
4
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
5
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
6
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
7
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
8
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
9
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
10
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
11
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
12
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
13
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
14
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
15
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
16
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
17
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
18
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
19
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
20
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"होय, पती राजाच्या हत्येच्या षडयंत्रात मी सहभागी होते..."; सोनम रघुवंशीचा कबुलीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:15 IST

हनीमूनच्या बहाण्याने सोनमने राजाला सोहराच्या निर्जनस्थळी नेले आणि इतर आरोपींना तिथले लोकेशन पाठवले

शिलांग - देशभरात चर्चेत असलेल्या राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. मेघालय पोलिसांसमोर राजाची पत्नी सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राज कुशवाहा आणि सोनम कपूरला आमनेसामने आणले. ठोस पुराव्यासोबतच सोनम आणि राज समोरासमोर आल्याने त्यांच्याकडे लपवण्यासारखे काहीच राहिले नाही त्यामुळे अखेर सोनमने रडत रडत तिचा गुन्हा कबुल केला आहे.

मेघालय पोलिसांनी ऑपरेशन हनीमून अंतर्गत २३ मे रोजी शिलांगच्या सोहरात झालेल्या राजा रघुवंशी हत्येच्या तपासात मोठा खुलासा केला. पोलिसांनी सोनम आणि राज कुशवाह दोघांना समोरासमोर आणून चौकशी केली. ४२ सीसीटीव्ही फुटेज, रक्ताने माखलेले जॅकेट, सोनमचे रेनकोट आणि अन्य पुरावे समोर ठेवले. पुराव्याच्या दबावामुळे सोनमनं अखेर तोंड उघडले आणि तिने गुन्ह्याची कबुली दिली. राज कुशवाह आणि ३ सुपारी किलर्स आकाश राजपूत, विशाल ठाकूर, आनंद कुर्मी यांच्यासोबत मिळून राजाच्या हत्येचा कट रचल्याचे तिने तपासात सांगितले.

हनीमूनच्या बहाण्याने सोनमने राजाला सोहराच्या निर्जनस्थळी नेले आणि इतर आरोपींना तिथले लोकेशन पाठवले. त्यानंतर सासूला अपरा एकादशीचा उपवास केल्याचे सोनमने खोटे सांगितले ते हॉटेलच्या रेकॉर्डमधून तिने जेवण केल्याचे समोर आले. हत्येनंतर सोनमने राजाच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून सात जन्मो का साथ ही पोस्ट पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी केली. पोलिसांना गुवाहाटी रेल्वे स्टेशनजवळ हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले. 

दरम्यान, मेघालय पोलिसांनी सोनम, राज कुशवाह आणि इतर तिन्ही आरोपींना अटक केली आहे. सोनमने ९ जून रोजी उत्तर प्रदेशच्या गाजीपूर इथं सरेंडर केले. राजाचा काटा काढून राज कुशवाहसोबत नव्याने आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सोनमने हे पाऊल उचलले हे तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणी राजाचा भाऊ सचिन आणि वडील अशोक रघुवंशी यांनी सोनमला फाशीची शिक्षा देत तिच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. तर सोनमचा भाऊ गोविंद यानेही हत्येतील आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी करत आम्हाला या षडयंत्राबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी