मुंबई - कोरोनाचे भयंकर संकट वाढत असल्याने लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू असताना नियमांची पायमल्ली करत वाधवान कुटुंबियांनी मुंबई, खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला होता. व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट घेणाऱ्या दीवान हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे (डीएचएफएल) प्रवर्तक, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भा. दं. वि. कलम १८८ अन्वये आणि कलम १४४ अंतर्गत याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच २३ जणांना क्वारंटाईन करण्यात होते. आज दुपारी त्यांना क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आले असून आता वाधवान बंधूंना सीबीआय अटक करू शकते.
Yes Bank Case: वाधवान कुटुंबीयांची क्वारंटाईनमधून मुक्तता, सीबीआय करू शकते अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 19:35 IST
Yes Bank Case : आज दुपारी त्यांना क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आले असून आता वाधवान बंधूंना सीबीआय अटक करू शकते.
Yes Bank Case: वाधवान कुटुंबीयांची क्वारंटाईनमधून मुक्तता, सीबीआय करू शकते अटक
ठळक मुद्देमहाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भा. दं. वि. कलम १८८ अन्वये आणि कलम १४४ अंतर्गत याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला.गेल्या १५ दिवसांपासून त्यांना एका हायस्कूलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं.