शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

प्रांताधिकाऱ्याची महिला तलाठ्याकडे शरीरसुखाची मागणी, अखेर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 12:59 IST

येवला येथील प्रांताधिकारी सोपान सुतार यांनी बदलीस पात्र नसतानाही नियम मोडून महिला तलाठ्याची बदली केली होती. या बदलीविरोधात महिला तलाठ्याने मॅट कोर्टात धाव घेतली.

नाशिक - जिल्ह्यातील येवला येथील प्रांताधिकाऱ्याने महिला तलाठ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याने तहसिल आणि महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पीडित महिलेनं याबाबत एक व्हिडिओ बनवून भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांना पाठवला होता. त्यानंतर, चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करत राज्य सरकारला जाब विचारला होता. याप्रकरणी आता गुन्हा नोंद झाला आहे. 

येवला येथील प्रांताधिकारी सोपान सुतार यांनी बदलीस पात्र नसतानाही नियम मोडून महिला तलाठ्याची बदली केली होती. या बदलीविरोधात महिला तलाठ्याने मॅट कोर्टात धाव घेतली. त्यावर, 23 ऑगस्टपर्यंत या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांकडेही महिलेने तक्रार केली होती. महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन आता संबंधित प्रांताधिकाऱ्याविरुद्ध विनयभंग आणि दमदाटीचा गुन्हा दाखल झाला आहे.  महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते. त्यामुळे, पीडिताने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे आपली कैफियत मांडली होती. कासार यांनी 3 ऑगस्ट रोजी आपल्या घऱी बोलावून अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, विरोध केल्यामुळेच त्यांनी आपणास नोटीस पाठवली. तसेच, आपली विभागीय चौकशी का करु नये, याचा खुलासा मागितला. त्यांच्या नोटीसीला उत्तर दिल्यानंतरही त्यांनी आपली बदली केल्याचे पीडिताने तक्रीरीत म्हटले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसChitra Waghचित्रा वाघ