यंदा अजून मुरगाव तालुक्यात १८ जण अमली पदार्थासहीत गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 08:30 PM2019-11-02T20:30:40+5:302019-11-02T20:33:53+5:30

जप्त गांजाची किंमत ३ लाख ५५ हजार रुपयांच्या आसपास आहे.

This year, in Murgaon taluka, there are 18 people arrested with drugs | यंदा अजून मुरगाव तालुक्यात १८ जण अमली पदार्थासहीत गजाआड

यंदा अजून मुरगाव तालुक्यात १८ जण अमली पदार्थासहीत गजाआड

Next
ठळक मुद्दे या प्रकरणात २ किलो ८८ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणात १८ जणांना गजाआड करण्यात आले.वेर्णा पोलिसांनी या वर्षात अजूनपर्यंत चार जणांना गजाआड करुन त्यांच्याकडून ६८४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.तालुक्यात पोलिसांनी २०१९ मध्ये १८ प्रकरणांत अमली पदार्थ पकडून संशयितांविरुद्ध कारवाई केली.

वास्को - मुरगाव तालुक्यात जास्त पर्यटनस्थळे नसली तरी येथे अमली पदार्थांचा व्यवहार मोठया प्रमाणात होत आहे. तालुक्यात पोलिसांनी २०१९ मध्ये १८ प्रकरणांत अमली पदार्थ पकडून संशयितांविरुद्ध कारवाई केली. या प्रकरणात २ किलो ८८ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणात १८ जणांना गजाआड करण्यात आले. जप्त गांजाची किंमत ३ लाख ५५ हजार रुपयांच्या आसपास आहे.

मुरगाव तालुक्यात दाबोळी विमानतळ, मुरगाव बंदर, रेल्वे स्थानक अशी अनेक महत्त्वाची आस्थापने आहेत. बोगमाळो समुद्र किनारा तसेच अन्य काही मोजकीच पर्यटक स्थळे येथे असली तरी अमली पदार्थाचा व्यवहार मोठया प्रमाणात होत असल्याचे उघड झाले आहे. यावर्षात मुरगाव तालुक्यातील वास्को पोलीसांनी सर्वात जास्त म्हणजे १२ प्रकरणांत कारवाई करुन १ किलो २८३ ग्रॅम गांजा जप्त करून १२ जणांना गजाआड केले. या प्रकरणात वास्को पोलिसांनी जप्त केलेला गांजा २ लाख ४ हजार रुपया किंमतीचा आहे. वेर्णा पोलिसांनी या वर्षात अजूनपर्यंत चार जणांना गजाआड करुन त्यांच्याकडून ६८४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. त्याची किंमत १ लाख २५ हजार रुपये होते. मुरगाव पोलिसांनी या वर्षात अमली पदार्थांच्या विरुद्ध दोनच कारवाया केल्या असून १२१ ग्रॅम गांजा जप्त करुन दोघाजणांना गजाआड केले. त्यांच्याकडून जप्त करण्यात अलेला गांजा २१ हजार रुपये किमतीचा आहे. मुरगाव तालुक्यात बंदर तसेच अनेक आस्थापने असल्याने येथे मोठया प्रमाणात दुसऱ्या राज्यातून अवजड वाहने येत असून या वाहनांवर नजर ठेवल्याचे पोलीस उपअधीक्षक सुनिता सांवत यांनी सांगितले.

पर्यटक हंगामाच्या काळात मुरगाव तालुक्यात गांजा व्यवहार करणाऱ्यांना गजाआड करण्यासाठी पोलीसांची करडी नजर­ - पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत
पर्यटन हंगाम असो किंवा नसो, अमली पदार्थांचा व्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुरगाव तालुक्यातील वास्को, वेर्णा तसेच मुरगाव पोलीस सतर्क आहेत. गोव्यातील पर्यटक हंगामाची सुरवात झाली असून ह्या काळात अमली पदार्थाचा व्यावहार गोव्यात वाढत असल्याचे मागच्या काही काळात दिसून आले आहे. यंदाच्या पर्यटक हंगामा काळात अमली पदार्थांच्या व्यवहारावर आळा आणून यात शामील असलेल्यांना गजाआड करण्यासाठी मुरगाव तालुक्यातील पोलीसांनी चौख रित्या नजर ठेवलेली आहे. रेल्वे मार्गाने अमली पदार्थ आणण्याचा प्रयत्न झाल्याचे यापूर्वी उघड झाल्याने रेल्वे स्थानकावर पोलिसांकडून सध्या कडक नजर ठेवली आहे. विमानतळ परिसरातही पोलिस सतर्क आहेत अशी माहीती पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली.

Web Title: This year, in Murgaon taluka, there are 18 people arrested with drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.